शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

नेवाशातील पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहाची इमारत मोडकळीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:36 PM

नेवासा परिसरात एकमेव असणा-या पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहाची इमारत मोडकळीस आली आहे. फर्निचरही कुचकामी झाले असून, भिंतींना तडे गेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या विश्रामगृहाला गळती लागत आहे. याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे विश्रामगृह केंव्हाही कोसळू शकते, अशी अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देनेवासा ते नेवासाफाटा मार्गावर पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह आहे. ३२ वर्षापूर्वी हे अद्ययावत विश्रामगृह उभारण्यात आले होते.शासकीय विश्रामगृहाची इमारत मोडकळीस आली आहे. फर्निचरही कुचकामी झाले असून, भिंतींना तडे गेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या विश्रामगृहाला गळती लागत आहे.वापरण्यास अयोग्य झालेल्या या विश्रामगृहाच्या दुरावस्थेबाबत स्थानिक प्रशासनाने वरिष्ठांकडे वारंवार दुरुस्तीचा तगादा लावला. मात्र, याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे विश्रामगृह केंव्हाही कोसळू शकते, अशी अवस्था झाली आहे.

सुहास पठाडेनेवासा : नेवासा परिसरात एकमेव असणा-या पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहाची इमारत मोडकळीस आली आहे. फर्निचरही कुचकामी झाले असून, भिंतींना तडे गेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या विश्रामगृहाला गळती लागत आहे. वापरण्यास अयोग्य झालेल्या या विश्रामगृहाच्या दुरावस्थेबाबत स्थानिक प्रशासनाने वरिष्ठांकडे वारंवार दुरुस्तीचा तगादा लावला. मात्र, याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे विश्रामगृह केंव्हाही कोसळू शकते, अशी अवस्था झाली आहे.नेवासा ते नेवासाफाटा मार्गावर पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह आहे. ३२ वर्षापूर्वी हे अद्ययावत विश्रामगृह उभारण्यात आले होते. अनेक महत्वाच्या व्यक्तींची येथे उठबस होत होती. त्यामुळे कायम गजबजलेले हे विश्रामगृह एकेकाळी तालुक्याच्या विविध घडामोडींचे केंद्रबिंदू ठरले होते. परंतू गेल्या तीन-चार वर्षांपासून या इमारतीच्या देखभालीकडे कानाडोळा झाल्याने इमारत मोडकळीला आली आहे.

इमारतीतील फर्निचरची पूर्णत: वाट लागलेली आहे. पावसाळ्यात छताला गळती लागते़ भिंतींना तडे गेलेले आहेत. काही खोल्यांमध्ये निकामी साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे. विज पुरवठा करणा-या वायरी अस्ताव्यस्त लोंबकळून शॉर्ट सर्कीटचा धोका तयार झाला आहे. किचन खोलीत सुविधा नसल्याने ते देखील खराब परिस्थीतीत बंद पडलेले आहे. एकेकाळी चार ते पाच कर्मचारी येथे कमी पडत होते. आज तेथे येणा-या जाणारांची संख्या रोडावल्याने केवळ एकमेव कर्मचारी या इमारतीच्या अवस्थेकडे हताशपणे पहात जबबादारी पार पाडत आहे.

पाण्याअभावी शौचालये बंद

काही शौचालयाची तर अत्यंत बिकट अवस्था होवून बंद स्थितीत आहेत. पाण्याच्या टाक्या फुटल्यामुळे पाणी पुरवठा व्यवस्थीत होत नाही. त्यामुळे शौचालये बंद करण्याची नामुस्की ओढावली आहे. इमारतीच्या बाहेरचा परिसर कचराकुंडी झाला आहे. सगळीकडे कचरा साचला आहे. बाहेर पाण्याचे तळे तर आतमध्ये पाणी टंचाई अशी अवस्था झाली आहे. बाहेरच्या दुर्गंधीमुळे विश्रामगृह परिसरात अनारोग्य पसरले आहे.

विश्रामगृह दुरुस्तीचे दोन वर्षात तीन वेळा वरीष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठवले असून पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध होत नसल्याने या विश्रामगृहाची दुरुस्ती रखडली आहे.- ओंकार झावरे, उपअभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, नेवासा

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा