लंकेंचा आदर्श घेऊन कोविड सेंटर उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:19 AM2021-04-19T04:19:36+5:302021-04-19T04:19:36+5:30

बोधेगाव : सध्या दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा शिरकाव थेट गावखेड्यांपर्यंत येऊन ठेपला आहे. अनेक ठिकाणी धावाधाव करूनही उपचारासाठी बेड मिळणे ...

Build the Covid Center following the example of Lanka | लंकेंचा आदर्श घेऊन कोविड सेंटर उभारावे

लंकेंचा आदर्श घेऊन कोविड सेंटर उभारावे

Next

बोधेगाव : सध्या दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा शिरकाव थेट गावखेड्यांपर्यंत येऊन ठेपला आहे. अनेक ठिकाणी धावाधाव करूनही उपचारासाठी बेड मिळणे मुश्कील बनले आहे. अशा परिस्थितीत मतदारसंघातील नेत्यांनी पारनेरचे आमदार नीलेश लंकेंचा आदर्श घेऊन ग्रामीण भागात किमान एखादे कोविड सेंटर उभारावे, असे आवाहन सर्वसामान्य नागरिकांकडून सोशल मीडियातून केले जात आहे.

शेवगाव-पाथर्डी या दोन्ही तालुक्यांत कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून शंभरी पारच आहे. सध्या नगर तसेच इतर शहरांत धावाधाव करताना कोरोना रुग्णांची हेळसांड होत आहे. अनेकांना ऑक्सिजन बेड मिळणे दुर्लभ झालेले आहे. गोरगरीब रुग्णांना तर कोरोना संसर्ग नसताना समोर मरण दिसत असल्याची अवस्था पाहायला मिळते आहे. अशावेळी धास्तावलेल्या सर्वसामान्य नागरिकांना येथील मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेऊन दिलासा देणे गरजेचे आहे, असे आवाहन केले जात आहे.

Web Title: Build the Covid Center following the example of Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.