सात महिन्यांनंतर रक्तपेढी पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:19 AM2021-04-14T04:19:38+5:302021-04-14T04:19:38+5:30

अहमदनगर : महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालातील गेल्या सात महिन्यांपासून बंद पडलेली रक्तपेढी मंगळवारी सुरू करण्यात आली असून, तांत्रिक ...

Blood bank resumes after seven months | सात महिन्यांनंतर रक्तपेढी पुन्हा सुरू

सात महिन्यांनंतर रक्तपेढी पुन्हा सुरू

Next

अहमदनगर : महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालातील गेल्या सात महिन्यांपासून बंद पडलेली रक्तपेढी मंगळवारी सुरू करण्यात आली असून, तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती बुधवारपासून सुरू केली जाणार असून, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात नागरिकांना अत्याल्प दरात रक्त उपलब्ध होईल, अशी माहिती स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी दिली.

महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रक्तपेढी पूर्ववत करण्यात आली. यावेळी आ. संग्राम जगताप, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, उपायुक्त यशवंत डांगे, डॉ. शंकर शेडाळे आदी उपस्थित होते. यावेळी घुले यांनी रक्तपेढीविषयीची माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या ७ महिन्यांपासून आपली रक्तपेढी बंद होती. रक्तपेढील सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रक्तपेढी सुरू करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकाला अल्पदरात रक्तपुरवठा केला जाईल. कोरोना संसर्ग वाढत असल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यापुढील काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध होईल, असे घुले म्हणाले.

...

सूचना फोटो आहे

Web Title: Blood bank resumes after seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.