शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

... तर ३० जानेवारीपासून पुन्हा उपोषण : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 11:03 AM

मागण्यांबाबत सरकारने मला आश्वासन दिले होते. त्यानुसार मी उपोषणाला बसणार होतो. मागण्यांबाबत सरकारात्मक पावले उचलली आहेत.

राळेगणसिध्दी :  मागण्यांबाबत सरकारने सरकारात्मक पावले उचलली आहेत. उवर्रित मागण्यांसाठी चार महिन्यांचा कालावधी मागितला आहे. त्यामुळे आम्ही दोन पावले मागे येण्याचा निर्णय घेता असून आजपासून सुरु होणारे उपोषण स्थगित करत असल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. चार महिन्यांच्या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एकदा ३० जानेवारीपासून एकदा उपोषण करणार असल्याची भुमिकाही अण्णा हजारे यांनी यावेळी मांडली.जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यामध्ये दोन तासांच्या चर्चेनंतर पत्रकारांशी संवाद साधण्यात आला.अण्णा हजारे म्हणाले, सरकार आमच्या देशाचे असल्यामुळे सरकारवर विश्वास आहे. चर्चा करुन प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले पाहिजे. सरकारने चार महिन्यात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारने मागण्यासंदर्भात सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यामुळे आम्हीही दोन पावले मागे आलो आहोत. चार महिन्यांच्या कालावधीत उवर्रित मागण्या मान्य न झाल्यास महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा उपोषण करणार आहे. या उपोषणाचे ठिकाण देशातील कार्यकर्त्यांशी चर्चा करुन ठरवले जाईल.महाजन म्हणाले, देश भ्रष्टाचारमुक्त व्हावा ही अण्णांची भुमिका आहे. तसेच शेतीमालाला हमीभाव मिळावा अशीही त्यांची मागणी आहे. हीच भुमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही आहे. त्यासाठी काम सुरु आहे. अण्णांच्या महत्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. राज्यात लोक आयुक्त नेमण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे