शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आस्थापना बंद, पोलिसांकडून कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 6:04 PM

अहमदनगर : कोरोना विषाणू संसर्गाचे जिल्ह्यात आतापर्यंत दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वारंवार आवाहन करुनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : कोरोना विषाणू संसर्गाचे जिल्ह्यात आतापर्यंत दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वारंवार आवाहन करुनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५मधील कलम ३० अन्वये विविध बाबींसाठी बंदी आदेश लागू केले आहेत. हे आदेश आजपासून लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणाºयांवर दंडनीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव, मिरवणूक, उरुस आदींना मनाई राहील. जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल्स अथवा अन्य वास्तूंमधील मॅरेज हॉल तसेच अन्य विवाह स्थळांच्या ठिकाणांचा वापर करण्यास बंदी राहील. जिल्ह्यात कार्यशाळा, मेळावा, सभा, मोर्चा, आंदोलन, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग यांच्या आयोजनास बंदी राहील. मंदिर, मशिद, गुरुव्दारा, चर्च व इतर धार्मिक स्थळे नागरिकांच्या प्रवेशासाठी बंद राहतील. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असणारी दुकाने/सेवा आस्थापना, उपाहारगृहे/खाद्यगृहे/ खानावळी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालय, व्हिडिओ पार्लर, आॅनलाईन लॉटरी सेंटर आदी बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व परमिट रुम बिअरबार बंद ठेवण्यात येत आहेत. सर्व नागरिकांना विहीत कारणाशिवाय अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील.-----------यांना आदेशातून वगळलेशासकीय/निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाने, रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅण्ड, बसथांबे व स्थानके, विमानतळ व रिक्षा थांबे, अंत्यविधी (गर्दी टाळून), अत्यावश्यक किराणा सामान, दूध/दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, औषधालय, पेट्रोलपंप, जीवनावश्यक वस्तू, विक्री/वितरीत करण्यास परवानगी राहील. परंतु येथेही गर्दी टाळण्याचे आवाहन आहे. दहावी, बारावी, तसेच राज्य शासन व केंद्र शासनाकडून घेण्यात येणाºया सर्व स्पर्धा परीक्षा विद्यापीठ/विश्व विद्यालयाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी व संबंधित शैक्षणिक काम पाहणारी व्यक्ती, प्रसार माध्यमांचे (सर्व प्रकारची दैनिक/नियतकालिके/टीव्ही न्यूज चॅनेल) कार्यालय चालू राहतील. विद्यार्थ्यांसाठी खानावळ, तसेच महाविद्यालय/वसतिगृह यामधील कॅन्टीन/मेस (केवळ परीक्षार्थी).----------------परदेशी प्रवाशांपासून सावधान आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. असे प्रवासी अहमदनगर जिल्ह्यामध्येही प्रवास करुन आलेले आहेत व काही प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव परसण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ न होऊ देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशा प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात होण्याची शक्यता लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे आदी बाबी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी हे बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.----------तर कारवाईस पात्र कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंडसंहिता (४५ आॅफ १९६०) च्या कलम १८८ नुसार दंडनिय, कायदेशीर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम ४३ (१) मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या