शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशनने राज्यातील ११ अनाथालयांना वाटले दहा टन धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 6:51 PM

अग्निपंख फौंडेशनने २२ विद्यालये आणि २४ प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या एक मूठ अनाथांसाठी या उपक्रमात सुमारे १० मेट्रीक टन धान्य जमा झाले असून हे धान्य राज्यातील अनाथ, आदिवासी, दिव्यांग, मूकबधिर मुलांच्या ११ वसतिगृहांना पाठविण्यास सुरूवात झाली आहे.

श्रीगोंदा : डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम असलेल्या अग्निपंख फौंडेशनने २२ विद्यालये आणि २४ प्राथमिक शाळांमध्ये राबविलेल्या एक मूठ अनाथांसाठी या उपक्रमात सुमारे १० मेट्रीक टन धान्य जमा झाले असून हे धान्य राज्यातील अनाथ, आदिवासी, दिव्यांग, मूकबधिर मुलांच्या ११ वसतिगृहांना पाठविण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून अनाथाची भूक भागणार आहे.महादजी शिंदे, श्रीमंत विजयाराजे शिंदे कन्या ज्ञानदीप, स्वामी समर्थ, मुरलीधर होनराव, कौशल्यादेवी नागवडे, स्कूल सनराईज, जिल्हा परिषद मुले व मुलींची शाळा (श्रीगोंदा) जनता विद्यालय, कन्या जनता, परिक्रमा (काष्टी), इंदिरा गांधी (श्रीगोंदा फॅक्टरी), न्यू इंग्लिश (मढेवडगाव), व्यंकनाथ (लोणीव्यंकनाथ), छत्रपती शिवाजी (बेलवंडी) विद्याधाम (देवदैठण), यशवंतराव चव्हाण, घारगाव, कोळाईदेवी ( कोळगाव), पंडित जवाहरलाल नेहरू (आढळगाव), वळणेश्वर (अजनुज), पंडित जवाहरलाल नेहरू (पिंपळगाव पिसा), हंगेश्वर (हंगेवाडी) या विद्यालयामध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.राज्यातील महामानव बाबा आमटे विकास सेवा संस्था श्रीगोंदा, सावली सेवाभावी संस्था केडगाव अहमदनगर, अनामप्रेम संस्था अहमदनगर, जिजाऊ बालसदन कोळे, ता. कराड, आदिवासी युग प्रवर्तक दगडी बारडगाव ता. कर्जत, सहारा अनाथालय, गेवराई, जि. बीड. सेवालय संस्था, हासेगाव, औसा, जि. लातूर, सार्थक सेवा संघ आंबळे, ता. पुरंदर, जि. पुणे, अविश्रांती बालसदन दौंड, सहारा अनाथालय जामखेड, शाहू बोर्डिंग सातारा व महात्मा फुले आश्रमशाळा घारगाव या संस्थांना धान्य पाठविण्यात येत आहे.

अग्निपंख फौंडेशनच्या ‘एक मूठ अनाथांसाठी..’ राबविलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवेतून काम करण्यासाठी ऊर्जा निर्माण होणार त्यामुळे हा उपक्रम दरवर्षी राबविण्याची गरज आहे.-तुकाराम कन्हेरकर, प्राचार्य, महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा.

मला कुणाला तरी मदत करण्याची इच्छा होती आणि एक मूठ अनाथांसाठी... या उपक्रमात गोरगरीब विद्यार्थी मित्रांना धान्यरुपी मदत करताना खूप आनंद झाला. पुढील वर्षीही या उपक्रमात भाग घेणार आहे.-वैभव शिंदे, इयत्ता आठवी, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आढळगाव.

महिलांचा सहभाग

या उपक्रमात आढळगाव येथील महिलांनी तसेच श्रीगोंदा व देवदैठण काही कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी जादा धान्य दिले तर देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेतील साहील गुंजाळ या विद्यार्थ्यांने सर्व प्रकारचे धान्य दिले. तर वेळू येथील शेतकऱ्यांनी घरोघर फिरून १०० किलो धान्य जमा केले. आढळगाव येथील अग्निपंखचे लाईफमेंबर महेशराव शिंदे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ५१ हजाराचा धनादेश दिला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा