कोपरगावात गुरुवारी १८ बाधित रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:17 AM2021-01-15T04:17:15+5:302021-01-15T04:17:15+5:30

कोपरगाव : कोपरगावात गुरुवारी ( दि. १४ जानेवारी ) रॅपिड अ‍ॅण्टिजेन किटद्वारे ४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १ ...

18 infected patients in Kopargaon on Thursday | कोपरगावात गुरुवारी १८ बाधित रुग्णांची भर

कोपरगावात गुरुवारी १८ बाधित रुग्णांची भर

Next

कोपरगाव : कोपरगावात गुरुवारी ( दि. १४ जानेवारी ) रॅपिड अ‍ॅण्टिजेन किटद्वारे ४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १ व्यक्ती बाधित आढळली आहे. २ व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. तर खासगी लॅब १, नगर अहवालात १६ असे एकूण १८ रुग्ण बाधित आढळले आहे. २५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. १३ व्यक्तींच्या घशातील स्त्राव हे नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

१४ जानेवारीअखेर २८१६ कोरोनाची लागण झाली. त्यात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ६७ बाधित व्यक्तींवर उपचार सुरू आहे. उर्वरित २७०६ बाधित व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत तालुक्यातील १९ हजार ५१२ व्यक्तींची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ४ हजार ३६० व्यक्तीची नगर येथे स्त्राव पाठवून तर १५ हजार १५२ व्यक्तींची रॅपिड अ‍ॅण्टिजेन किटद्वारे तपासणी केली असल्याचेही डॉ. फुलसौंदर यांनी सांगिलते आहे.

Web Title: 18 infected patients in Kopargaon on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.