शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची टक्केवारी विधानपरिषदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:01 IST

जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरती प्रक्रिया गाजत असतानाच वैद्यकीय बिलासाठी दहा टक्क्यांची मागणी केल्याचा धक्कायदाक प्रकार समोर आला आहे. आधीच आजाराने बेजार संबंधित रुग्णाने विधान परिषद अध्यक्षांकडे टक्केवारीसाठी नगर जिल्हा परिषदेत अडकलेले बिल काढून देण्याची विनंती केली.

ठळक मुद्देचार लाखांच्या बिलासाठी मागितले १० टक्के विधान परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकांचा फोन खणाणला

अहमदनगर : जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरती प्रक्रिया गाजत असतानाच वैद्यकीय बिलासाठी दहा टक्क्यांची मागणी केल्याचा धक्कायदाक प्रकार समोर आला आहे. आधीच आजाराने बेजार संबंधित रुग्णाने विधान परिषद अध्यक्षांकडे टक्केवारीसाठी नगर जिल्हा परिषदेत अडकलेले बिल काढून देण्याची विनंती केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत विधान परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकांनी जिल्हा परिषदेत फोन करून अधिका-यांची  चांगलीच कानउघडणी केली. मंत्रालयातून आलेल्या फोनची जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा सुरू आहे.जिल्हा परिषदेची नुकतीच झालेली सर्वसाधारण सभा अनुकंपा भरतीतील गैरव्यवहारावरून चांगलीच गाजली. ही घटना ताजी असतानाच विधान परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकांचा फोन जिल्हा परिषदेत खणाणला. मंत्रालयातून जिल्हा परिषदेत फोन येत असतात परंतु, हा फोन काही वेगळ्याच कामासाठी होता. शिक्षकाचे चार लाखांचे वैद्यकीय बिल माध्यमिक विभागात आहे, ते काढून द्या आणि ते का अडविले होते, याचीही जरा चौकशी करा, असे स्वीय सहाय्यकाने फोनवरून सांगितले. वैद्यकीय बिल काढण्यासाठी मंत्रालयातून फोन आल्याने संबंधित कर्मचा-याचे पितळ उघडे पडले. टक्केवारीच्या फोनने जिल्हा परिषद यंत्रणेला खडबडून जाग आली. मुख्यधिका-यांपासून सर्वच कामाला लागले. संबंधित कर्मचा-यांची मुख्यकार्यकारी अधिकाºयांनी चांगलीच कानउघडणी केल्याचीही चर्चा आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कर्मचा-यास पैसे घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना मध्यंतरी घडली. अनुकंपा भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप सदस्य सुनील गडाख यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीही सुरू आहे.

जिल्हा परिषदेत कार्यरत असताना मृत पावलेल्यांच्या वारसांना नोकरी मिळते. आठ जणांची तर वयोमर्यादा संपून गेली तरी त्यांना नोकरी मिळाली नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्यावर कळस असा की आजारातून उठलेल्या व्यक्तीकडे वैद्यकीय बिल काढण्यासाठी पैशांची मागणी केली गेली. यावरून जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालतो, याची कल्पना न केलेली बरी... 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद