-----------
सोलंके, यादव यांना पदोन्नती
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांची बीड जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. सोळंके यांच्या जागी पुणे जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोईनकर हे बदलून आले आहेत. याशिवाय जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक पी. डी. यादव यांची बदली मागील पंधरा दिवसांपूर्वीच झाली होती. परंतु त्यांना नियुक्तीचे ठिकाण मिळाले नव्हते. त्यांना आता रत्नागिरी जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
---------------
गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या
जिल्ह्यातून बदलून गेलेले
जामखेडचे बीडीओ परशुराम कोकणी यांची तळोदा (जि. नंदूरबार) येथे बदली.
श्रीगोंद्याचे बीडीओ प्रशांत काळे यांची पंढरपूर (जि. सोलापूर) येथे बदली.
--------
जिल्ह्यात बदलून आलेले
अनिल नागणे (सावनेर, जि. नागपूर) येथून संगमनेर बीडीओ पदी.
गोरख शेलार (प्रकल्प संचालक, जि. प. सोलापूर) येथून श्रीगोंदा बीडीओ पदी.
मच्छिंद्रनाथ धस (मंठा, जि. जालना) येथून श्रीरामपूर बीडीओ पदी.