शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेकडून टँकर घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

By सुधीर लंके | Updated: June 24, 2020 12:37 IST

नगर जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या टँकर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत, असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. 

लोकमत इफेक्ट

अहमदनगर : नगर जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या टँकर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत, असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. 

नगर जिल्ह्यात सन २०१९ मध्ये टँकरच्या बोगस खेपा दाखवून शासकीय बिले काढण्यात आल्याची तक्रार पुराव्यानिशी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केलेली आहे. ‘लोकमत’ने मागील वर्षी स्टिंग आॅपरेशन करून टँकरच्या खेपांची अनियमितता चव्हाट्यावर आणली होती. नगर जिल्ह्यात १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत टंचाईग्रस्त गावांना शासकीय टँकरच्या आधारे पाणीपुरवठा करण्यात आला. या टँकरसाठी शासनाने ठेकेदार नियुक्त केले होते. 

दरम्यान वर्षभरात या टँकरवर १०१ कोटींचा खर्च झाला. ठेकेदार संस्थांनी काही ठिकाणी बनावट जीपीएस अहवाल जोडून गटविकास अधिकाºयांकडून बिले काढली. गटविकास अधिकाºयांनीही काहीही शहानिशा न करता ही बिले अदा केली. याबाबत लोकमतने सातत्याने पाठपुरावा केला. शिवाय पारनेर येथील सामाजिक कार्यकर्ते बबन कवाद व रामदास घावटे यांनीही टँकर घोटाळ्याबाबत शासनाकडे तक्रार केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांना टँकर घोटाळ्याच्या तक्रारीबाबत ‘लोकमत’ला सांगितले की, तक्रारदाराने विभागीय आयुक्तांकडे तक्रार केलेली असली तरी त्यांचे आदेश येण्याअगोदर ‘लोकमत’ला आलेल्या बातमीच्या आधारे चौकशी होऊ शकते. 

बनावट जीपीएसच्या आधारे टँकरची बिले काढल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच आपण याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. गावडे यांना सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सविस्तर चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. 

ती जबाबदारी जिल्हा परिषदेची जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, ते म्हणाले, टँकर बिलांबाबतची कार्यवाही जिल्हा परिषदेकडून होते. त्यामुळे त्याबाबत अधिक माहिती जिल्हा परिषदेकडून मिळू शकेल. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषदwater transportजलवाहतूक