शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे अटकेत : सुुट्ट्या पैैशाच्या बहाण्याने लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 17:47 IST

निवडणुकांमध्ये वाटप करण्याकरिता दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून कमिशनवर सुटे पैैसे देण्याचे आमिष दाखवत श्रीमंतांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा प्रमुख

श्रीरामपूर : निवडणुकांमध्ये वाटप करण्याकरिता दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून कमिशनवर सुटे पैैसे देण्याचे आमिष दाखवत श्रीमंतांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा प्रमुख सूत्रधार नेवासा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे याला शहर पोलिसांनी अटक केली. शिवसेनेचा उपतालुका प्रमुख बिट्टू वायकर याला दिल्ली येथून सोमवारी ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच पोलिसांना सूत्रधाराविषयी माहिती दिली.आरोपी वाकचौरे याला न्यायालयात हजर केले असता त्याची २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या टोळीने महांकाळवाडगाव येथील कापसाचे व्यापारी चांगदेव अंबादास पवार यांना ७५ लाख रुपयांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले होते. गुन्ह्यातील १५ आरोपींना अटक करण्यात यश आले असले तरी अद्यापही ५ आरोपी फरार आहेत. शहर पोलिसात पवार यांनी फिर्याद दिली होती. पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून त्यांना एमआयडीसी परिसरातून ५ जुलै रोजी लुटले होते.याप्रकरणी राहुरी येथील सचिन उदावंत, राहुल उदावंत, सर्वेश प्रजापती (जळगाव), शैैलेश उर्फ विकी भंडारी (धुळे), राजेश शिंदे (नान्मज दुमाला, ता.संगमनेर), जितेंद्र पाटील (एरंडोल) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. रविवारी दत्ता मोहन पन्हाळे (शिंदेवाडी, जि.पुणे), किरण काशिनाथ वेताळ (लोणी काळभोर), आशिष याकोब खरात (दौंड), अतुल जयसिंग ज-हाड (केडगाव चौफुला) व बिट्टू कृष्णा वायकर (श्रीरामपूर), दीपक इंगळे, सागर गंगावणे (श्रीरामपूर), सुनील नेमाणे (श्रीरामपूर) यांना दिल्ली येथून ताब्यात घेतले. हा संपूर्ण कट दिलीप वाकचौरे यांनी रचला. सुनील नेमाणे व वाकचौरे हे जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते. त्यांनी कट रचल्यानंतर टोळीतील इतरांचा त्यात सहभाग झाला. वाकचौरे यांना २८ लाख रुपये दिले जाणार होते.गुन्हा चव्हाट्यावर आल्यास प्रकरण मिटविण्याचे आश्वासन वाकचौरे यांनी इतर आरोपींना दिले होते. ते माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. काँग्रेस पक्षाकडून २०१४ मध्ये त्यांनी नेवाशातून उमेदवारी केली होती. मात्र त्यांना अपेक्षित मते मिळाली नव्हती.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसShrirampurश्रीरामपूरNevasaनेवासा