शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कार अपघातात जिल्हा परिषदेचे सीईओ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:22 IST

अहमदनगर : कार व जेसीबी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कारमधील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर जखमी झाले, ...

अहमदनगर : कार व जेसीबी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कारमधील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर जखमी झाले, तर निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित किरकोळ जखमी झाले. नगर-कल्याण महामार्गावरील आणेजव‌‌ळ नांदूर फाटा येथे मंगळवारी (दि. १९) दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

सीईओ क्षीरसागर व आरडीसी निचित हे नगरवरून एका अंत्यविधीसाठी संगमनेर तालुक्यात निघाले होते. नगर-कल्याण महामार्गाने जात असताना आणेजवळ त्यांच्या इन्होवा कारला (एमएच १२ जेएम ६५५१) नांदूरला जोडणाऱ्या रस्त्याने जेसीबी अचानकपणे आडवा आला व अपघात झाला. त्यात क्षीरसागर यांच्या डोक्याला मार लागला, तर संदीप निचित हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांना मिळताच त्यांनी तेथील प्रशांत दाते व रामदास देशमुख यांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळी जात दोघांनाही आळेफाटा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याचे आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर पवार यांनी सांगितले.

------------फोटो - १९सीईओ अपघात

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या कारला नगर-कल्याण महामार्गावर आणेजवळ अपघात झाला.