शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘झीरो बजेट’ शेती व्यवहार्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 06:06 IST

शेतीमध्ये बियाणे, मजुरी, यंत्रसामुग्री आदींसाठी शेतकऱ्यांना खर्च लागतो़ त्यामुळे ‘झीरो बजेट’ या शब्दाला काहीही अर्थ नाही़

- भाऊसाहेब येवले राहुरी (जि. अहमदनगर) : शेतीमध्ये बियाणे, मजुरी, यंत्रसामुग्री आदींसाठी शेतकऱ्यांना खर्च लागतो़ त्यामुळे ‘झीरो बजेट’ या शब्दाला काहीही अर्थ नाही़ झिरो बजेट ही पद्धती शेतीमध्ये व्यवहार्य नाही़ मात्र सेंद्रीय शेतीसंदर्भात पूर्वीपासून शेतकऱ्यांमध्ये आस्था आहे़ त्यावर अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल़ बहुतांश शेतकºयांचाच झिरो बजेट शब्दाला विरोध असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ के.पी. विश्वनाथा यांनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले़शेती करण्यासाठी पैसा लागतो़ पैशांशिवाय शेती करणे अशक्य आहे़ यासंदर्भात राज्यपालांच्या आदेशाप्रमाणे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात संशोधन करण्यात येईल़ संशोधनासाठी लागणारा निधी भविष्यकाळात उपलब्ध होऊ शके ल़, असे ते म्हणाले. विद्यापीठामध्ये कमी जागा भरलेल्या असताना संशोधन कसे होणार? याबाबत विश्वनाथा म्हणाले, निधीबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल़ झिरो बजेट हा शब्द अलीकडील काळात आला़ शेतकरी झिरो बजेटच्या विरूद्ध आहेत. बजेटमध्ये राबविण्यात येणाºया बाबी जुन्या आहेत़ नैसर्गिक शेतीचा अभ्यास करून त्यातून जमिनीचा पोत कसा वाढविता येईल, याचा विचार केला जाईल़ राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे निष्कर्ष सर्वांना दिशादर्शक ठरतील, असे मतही विश्वनाथा यांनी व्यक्त केले़>‘झीरो बजेट’ला शेतकºयांचा विरोधपुणे येथे झालेल्या कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत २० पैकी १७ शेतकºयांनी झिरो बजेटला विरोध केला. शेतकºयांचे म्हणणे असे आहे की, विद्यापीठाने त्यावर संशोधन करावे़ त्यानंतर यश अपयशाबाबत निर्णय घ्यावा. पुढील काही वर्षात झिरो बजेट शेतीवर संशोधन केले जाईल़ शेतकºयांच्या अनुभवाचाही अभ्यास केला जाईल़