शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदानावेळी भिडले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 12:38 IST

युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी घेण्यात आलेल्या मतदानावेळी दोन गटात हाणामारी झाली. आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या सूनबार्इंनी आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला.

श्रीरामपूर : युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीसाठी घेण्यात आलेल्या मतदानावेळी दोन गटात हाणामारी झाली. आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या सूनबार्इंनी आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. आमदार कांबळे व उपनगराध्यक्ष ससाणे गटात झालेला हा दुसरा राडा असून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची डोकेदुखी वाढली आहे.येथील व्यापारी मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी मतदानास सुरवात झाली. उपनगराध्यक्ष करण ससाणे हे स्वत: प्रदेश महासचिवपदासाठी रिंगणात आहेत. विधानसभा समितीकरिता माजी नगराध्यक्ष संजय फंड यांचे चिरंजीव सिद्धार्थ उमेदवारी करीत होते. सकाळपासूनच मतदान केंद्रावर ससाणे समर्थकांची मोठी गर्दी होती. युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी ससाणे यांच्या पारड्यात वजन टाकले आहे.दरम्यान, आमदार पुत्र व नगरसेवक अ‍ॅड.संतोष कांबळे आपल्या समर्थकांसह केंद्रावर आले. कांबळे यांच्या पत्नी सुधा यांनी मतदान प्रतिनिधीला आधारकार्ड दाखविले. मात्र त्यावर मतदान झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यावरून वादावादी सुरू झाली.या दोन्ही गटात गेल्या काही दिवसात झालेला हा दुसरा राडा आहे. आमदार कांबळे यांनी ससाणे समर्थकांवर आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोपही केला होता. पुढील काळात होणा-या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकरिता हे वाईट संकेत मानले जात आहेत. विरोधी पक्ष नेते विखे यांना मानणारे हे दोन्ही गट आहेत. मात्र या अंतर्गत लढाईपुढे त्यांनीही हात टेकले असल्याचे दिसते. ससाणे समर्थकांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर