कोपरगाव : पृथ्वीवरील ओझोन आवरण वाचवण्यासाठी तरुण विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे. स्थानिक पातळीवरील संसाधनांचा विवेकी वापर करून अतीआरामदायी जीवन पद्धतीचा त्याग करून आपल्या गरजांवर मर्यादा घातल्या पाहिजे. त्याचबरोबर ओझोनचा ऱ्हास थांबवण्यासाठी तरुणाईने निसर्गपूरक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी सिक्कीम येथील नरबहादूर भंडारी शासकीय महाविद्यालयातील प्रा. चेतराज शर्मा यांनी केले.
के. जे. सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये भूगोल विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक ओझोन दिन’ साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने विद्यार्थ्यामध्ये ओझोनक्षयासंदर्भात जनजागृती करण्यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाला एकूण ५६ विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. या व्याख्यानांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. वसुदेव साळुंके यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी केले तर डॉ. गणेश चव्हाण यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. विजय ठाणगे, डॉ. संतोष पगारे, कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे व भूगोल विभागाचे प्रा. आकाश सोनवणे, प्रा. लीना त्रिभुवन, प्रा. कुणाल शिंदे यांनी परिश्रम घेतले.