शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

प्रियकरासाठी दिवसाला एक अल्पवयीन मुलगी सोडते घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 11:46 IST

 जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत ६४० अल्पवयीन मुली प्रियकराचा हात धरून पळून गेल्या आहेत. दिवसाला एक असे हे प्रमाण आहे. घर सोडल्यानंतर चित्रपटातील हिरो-हिरोईनप्रमाणे सुखी संसाराचे स्वप्न पाहणा-या या मुलींच्या आयुष्याची मात्र पुरती वाताहत झाल्याचे समोर आले आहे. 

संडे स्टोरी क्राईम / अरुण वाघमोडे / उमलत्या वयात शारीरिक आकर्षणातून किशोरवयीन मुले-मुली सहज एकमेकांच्या प्रेमात पडतात. पे्रमाची ही अभासी दुनिया त्यांना वास्तव वाटू लागते अन् यातूनच बंडाखोर प्रवृत्ती जन्म घेते. प्रियकराने दिलेले लग्नाचे आमिष आणि त्याच्या भूलथापांना बळी पडून या अल्पवयीन सहजरित्या घराचा उंबरठा ओलांडत आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत ६४० अल्पवयीन मुली प्रियकराचा हात धरून पळून गेल्या आहेत. दिवसाला एक असे हे प्रमाण आहे. घर सोडल्यानंतर चित्रपटातील हिरो-हिरोईनप्रमाणे सुखी संसाराचे स्वप्न पाहणा-या या मुलींच्या आयुष्याची मात्र पुरती वाताहत झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाकडे गेल्या दोन वर्षांत अपनयन (पळवून नेलेले) झालेल्या अल्पवयीन मुले, मुले, महिला व पुरुषांच्या संख्येची नोंद आहे. यामध्ये ६४० अल्पवयीन मुली, ३३ महिला, १४६ मुले तर २३ पुरुषांची नोंद आहे़ अपनयन (उचलून पळवून नेणे) झालेल्या सर्व मुली या १४ ते १८ वयोगटातील आहेत. मुलींच्या घटनांमध्ये ६४० पैकी ५३० गुन्हे उघडकीस आलेले आहे. तर १०९ प्रकरणे प्रलंबित आहेत.सध्या सोशल मीडियामुळे मुला-मुलींमधील संवाद फारच सोपा झाला आहे. ‘टीन’ एज(पौगंडावस्था) मध्ये विरुद्ध लिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण निर्माण होते. यातून मैत्री, प्रेम आणि लग्न करण्याचा विचार या प्रेमीयुगलांमध्ये सुरू होतो़. या सर्व गोष्टींना घरच्यांचा विरोधत असतो. त्यामुळे कुणाला काही न सांगता मुली प्रियकरासोबत निघून जातात. अनेक प्रकरणात मुली त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या मुलांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्या आहेत. आपली फसवणूक होत आहे हेही त्यांच्या लक्षात येत नाही. लग्नाचे आमिष, शहरात राहण्याचे आकर्षण यातून त्या प्रियकरासोबत घरातून निघून जातात. यातून दोन कुटुंबात वाद होतात. प्रकरण पोलीस ठाण्यात जाते. यातून मुलगी आणि मुलांच्या माता-पित्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आॅपरेशन मुस्कानतंर्गत ३६ मुलांचा शोध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातंर्गत २०१९मध्ये राबविलेल्या आॅपरेशन मुस्कानतंर्गत जिल्ह्यातून अपहरण व मिसिंग झालेल्या ५७ मुलांचा शोध घेण्यात आला. यात २७ मुली व ९ अल्पवयीन मुले तर २१ बालकांचा समावेश आहे. सापडलेल्या या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ कांबळे यांनी सांगितले. ब्लॅकमेल करून मुलींवर अत्याचार अल्पवयात मुलींना बहुतांशी गोष्टीचे ज्ञान नसते याचा गैरफायदा अनेक जण घेतात. मैत्री केल्यानंतर सदर मुलीचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढले जातात. यातून त्यांना ब्लॅकमेल करून शारीरिक अत्याचाराच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत. १६ दिवसांत २४ अल्पवयीन मुलींना फूस १ ते १६ जानेवारी २०२० या सोळा दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणच्या २४ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहे़.दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींबाबत हे प्रमाण वाढत आहे.उमलत्या वयात आयुष्याची वाताहत अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची पोलीस ठाण्यात कलम ३६३ अंतर्गत फिर्याद दाखल होते. चार महिन्यांत स्थानिक पोलिसांना या मुलीचा शोध घेता आला. नाही तर ही केस अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग होते. या विभागामार्फत मुलीचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले जाते. पोलिसांना शोधमोेहिमेदरम्यान अपनयन झालेल्या अनेक मुली य दयनीय अवस्थेत आढळून आल्या आहेत. काहींवर अल्पवयात मातृत्व लादने, वाम मार्गाला लावणे तर काही मुलींची परराज्यात विक्री झाल्याचे समोर आले. मुलगी सापडल्यानंतरही काही पालक त्यांचा स्वीकार करण्यास नकार दिला. अशा मुलींना बालसंरक्षण गृहात पोलिसांनी दाखल केले आहे. काय काळजी घ्यावी पालकांनी प्रेमप्रकरणातून मुले-मुली घरातून निघून जाणे हे प्रमाण वाढत आहे. याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. माता-पित्यांनी वयात येणाºया पाल्यांशी मैत्रीचे नाते निभवावे, त्यांच्या भावभावना समजून घ्याव्यात. घराबाहेर गेल्यानंतर आपला मुलगा-मुलगी काय करते याकडे लक्ष्य ठेवावे. पाल्य चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला वेळीच समज द्यावी. पाल्यांना गरजेइतक्याच वस्तू द्याव्यात, असे न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. निर्मला चौधरी यांनी सांगितले.     

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट