मंगळवारी (दि. २७) शिक्षकांनी सिंधू लॉन्समध्ये ५० बेडचे कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू केले. येथे सध्या ४० जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शिक्षकांच्या सामाजिक उत्तरदायित्वांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्या सहकार्यातून पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी साईलता सामलेटी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी हे सेंटर सुरू केले आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, गटनेते अजय फटांगरे, सदस्य रामहरी कातोरे, संगमनेर पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी या सेंटरला भेट देत शिक्षकांनी हाती घेतलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.