शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

येळकोट येळकोट जय मल्हार....कोरोना होऊ दे हद्दपार, राहुरीच्या खंडोबा यात्रेची दोनशे वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:32 IST

राहुरी : राहुरीचे ग्रामदैवत खंडोबा महाराज यांची यात्रा उत्सव परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली आहे. कोरानाचे सावट असल्यामुळे खंडोबा मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिराला कुलूप लावून बंद करण्यात आले. इतिहासात प्रथमच दोनशे वर्षांची यात्रेची परंपरा खंडित झाली. येळकोट येळकोट जय मल्हार, कोरोना होऊ दे हद्दपार, अशीच याचना ग्रामस्थांनी केली.

राहुरी : राहुरीचे ग्रामदैवत खंडोबा महाराज यांची यात्रा उत्सव परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली आहे. कोरानाचे सावट असल्यामुळे खंडोबा मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिराला कुलूप लावून बंद करण्यात आले. इतिहासात प्रथमच दोनशे वर्षांची यात्रेची परंपरा खंडित झाली. येळकोट येळकोट जय मल्हार, कोरोना होऊ दे हद्दपार, अशीच याचना ग्रामस्थांनी केली.आज रविवारी राहुरीचे ग्रामदैवत खंडोबाची यात्रा म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र संचारबंदी असल्यामुळे भाविक मंदिराकडे फिरकले नाहीत. घरी बसून येळकोट जय मल्हार म्हणत भाविकांनी यंदा घरीच यात्रा साजरी केली. यात्रा उत्सवाच्या दोनशे वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच यात्रा खंडित झाल्याचे समोर आले आहे. राहुरीच्या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून भाविक दरवर्षी हजेरी लावत असतात. माणसांनी भरलेल्या बारागाड्या ओढण्याची परंपरा जुन्या काळापासून चालत आली आहे. कुस्तीच्या हंगामाला ही पहिलवान हजेरी लावत असतात.कोरोनाच्याच्या पार्श्वभूमीवर यंदा यात्रा उत्सव भरणार नसल्याचे यात्रा कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.त्यानुसार आज रविवारी यात्रा संपन्न झाली नाही. भाविकांनी घरी खंडोबाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. भाविकांनी घरी राहूनच खंडोबाचे दर्शन घ्यावे,असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते या आव्हानाला प्रतिसाद देत घरीच यात्रा साजरी केली. त्यामुळे अनेक पिढ्यांची यात्रा भरण्याची परंपरा पहिल्यांदाच खंडित झाल्याचे भाविकांकडून सांगण्यात आले. राहुरी येथे जुने मंदिर होते. दांशुर अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर दहा वषार्पूर्वी मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धा करण्यात आला होता.---खंडोबा यात्रा कमिटीच्या वतीने बैठकीमध्ये यात्रा भरण्याचे नियोजन करण्यात आले होते मात्र कुणाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता सर्वांनी घरी बसूनच यात्रा उत्सव साजरा करावा असे आव्हान यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. यात्रा कमिटीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व भाविकांची मन:पूर्वक आभार. पोलिसांनी मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवला होता.