शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या भाविकांचा नगर जिल्ह्यातील राहुरी येथे अपघात; ३ ठार, ८ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 15:54 IST

साई दर्शन करुन शिर्डीवरुन शनिदर्शनासाठी निघालेल्या यवतमाळच्या भाविकांचा राहुरी येथे नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. यात एक जागीच ठार तर अन्य दोघांचा नगरला रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

राहुरी (अहमदनगर) : साई दर्शन करुन शिर्डीवरुन शनिदर्शनासाठी निघालेल्या यवतमाळच्या भाविकांचा राहुरी येथे नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. यात एक जागीच ठार तर अन्य दोघांचा नगरला रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.शनिवारी साईबाबांचे दर्शन करुन यवतमाळचे भाविक शनि दर्शनासाठी शिंगणापूर येथे जात होते. दरम्यान राहुरी येथे नादुरुस्त झालेला एक आयश टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याचे चाक बदल्याचे काम सुरु असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने आलेले खासगी प्रवासी वाहन (मॅक्स जीप) या टेम्पोवर आदळले. यात जीपचा चालक जागीच ठार झाला तर अन्य दहाजण जखमी झाले होते. मयत चालकाचे नाव समजू शकले नाही. पाच जखमींवर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून, इतर पाच जखमींना अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. सुनीत गेडाम (वय २४, रा़ वणी, यवतमाळ), राजेश झुनगरे (वय ४५, रा़ वरोरा, यवतमाळ), गणेश बनसोड (वय २४, रा़ वणी, यवतमाळ), घोला पसारे (वय २४, रा़ चिंचमंडळ, यवतमाळ), अंकित सोनगे (वय १९, तुकूम, चंद्रपूर) या पाच जणांवर राहुरीत उपचार सुरु असून, त्यांनाही नगरला हलविण्यात आले. मात्र त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. राहुरी ग्रामीण रुग्णालयात डॉ़ वर्षा डोईफोडे, डॉ़ सचिन पोखरकर, डॉ़ रणसिंग यांनी जखमींवर उपचार केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघातRahuriराहुरी