श्रीरामपूर : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला. त्यावरच आज शेती, सहकार, शैक्षणिक व औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्याची इमारत उभी आहे, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
लोकसेवा विकास आघाडीच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुरकुटे यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले, यावेळी ते बोलत होते. अशोक बँकेचे संचालक नाना पाटील, व्यापारी असोसिएशनचे संचालक अमोल कोलते, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, खादी ग्रामोद्योग संघाचे उपाध्यक्ष प्रवीण फरगडे, साजिद मिर्झा, संकेत संचेती, अमोल कालंगडे, दिनानाथ गिरमे, मच्छिंद्र भवार आदी यावेळी उपस्थित होते.
मुरकुटे म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे अत्यंत प्रगल्भ व सुसंस्कृत नेतृत्व होते. आज राज्याला प्रगतीकडे न्यायचे असेल तर त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जावे लागेल.
यावेळी सागर भागवत, प्रदीप जाधव, मनोज दिवे, सागर कांबळे, प्रमोद करंडे, सुरेश कांगुणे, अशोक देवकर, सोहम मुळे, बाळासाहेब मोरगे आदी उपस्थित होते. अशोक कारखाना कार्यस्थळावरदेखील अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ यांच्या हस्ते चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष पोपटराव जाधव, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, कार्यालय अधीक्षक आप्पासाहेब दुशिंग, नीलेश गाडे, नानासाहेब लेलकर उपस्थित होते.