शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक स्तनपान जागृती सप्ताह : आईचे दूध हिच बाळाची संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 14:02 IST

आईच्या दुधाचे महत्त्व आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र सध्याच्या धावत्या जगातल्या आजच्या आईला आपल्या बाळाची ही निकड किती प्रमाणात पूर्ण करता येते हा प्रश्नच आहे.

अरुण वाघमोडेअहमदनगर : आईच्या दुधाचे महत्त्व आपण अनेकदा ऐकत असतो. मात्र सध्याच्या धावत्या जगातल्या आजच्या आईला आपल्या बाळाची ही निकड किती प्रमाणात पूर्ण करता येते हा प्रश्नच आहे. जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफच्या विद्यमाने संयुक्त स्तनपान आणि बालकांचे आरोग्य विषयी जनजागृतीपर अभियान राबविले जाते. दरवर्षी ७ आॅगस्ट हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. याच संदर्भात बालरोगतज्ज्ञ डॉ़ अनिलकुमार    कु-हाडे यांच्याशी साधलेला संवाद़़प्रश्न : स्तनपान आई आणि बाळासाठी किती महत्त्वाचे आहे?उत्तर : आईचं दूध हे बाळासाठी अमृतच आहे़ अलीकडे काही माता बाळाला अंगावर पाजण्यासाठी उत्सुक नसतात. बाळासाठी आईचं दूध हे पूर्णान्न आहे, हे लक्षात घ्यायला हवं. बाळाला वयाच्या सहा महिन्यांपर्यंत केवळ हाच आहार देण्यात येतो. पण बाळाला योग्य प्रकारे स्तनपान देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या पद्धतीने आईला काही समस्या उद्भवू शकतात. तसेच बाळांना कुपोषण होऊ शकते. परिणामी अनेकदा संसर्ग होतो. त्यामुळे आईला ज्या स्थितीमध्ये आरामदायी वाटत असेल, त्या स्थितीत तिने स्तनपान द्यावे.प्रश्न : जन्मानंतर किती वेळाने बाळाला आईचे दूध द्यावे ?उत्तर : आईच्या दुधामुळे बाळाला वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकणाऱ्या संसर्गाचं प्रमाण कमी होते, कारण आईच्या दुधामध्ये प्रतिजैविक असतात. सामान्य प्रकृती असलेल्या बाळाला जन्मानंतर तीस मिनिटांच्या आत बाळाला आईचे दूध द्यावे़आईच दूध निर्जंतुक असतं. त्यामुळेच बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्याचा लाभ मुलांना भावी आयुष्यात होतो.रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार, दमा यासारख्या आजारांपासून बाळाच संरक्षण होतं.प्रश्न : बाळाला आईचे दूध सुरू असेपर्यंत पाणी देण्याची गरज असते का?उत्तर : बाळाला आईचे दूध सुरू असेपर्यंत सहा महिने बाळाला वेगळे पाणी पाजण्याची गरज नसते. दुधातून बाळाला अधिक प्रमाणात लॅक्टोज, प्रथिने, जीवनसत्त्वे, क्षार आणि पाणी मिळते, त्यामुळे त्याची तहानही भागते. स्तनपानामुळे बाळाची तहान, भूक दोन्ही भागते. स्तनपानानंतर बाळाला ढेकर देण्यास मदत करावी. सहा महिन्यानंतर उकळून गार केलेले पाणी थोड्या प्रमाणात देण्यास हरकत नाही़आईच्या आरोग्यावर परिणाम होतो?स्तनपानाचे फायदे बाळाबरोबर आईलाही होत असतात. हे फायदे केवळ शारीरिक नसून मानसिकही असतात. आई व बाळामधील भावनिक बंध घट्ट होण्यास मदत होते. स्तनपान देताना आईने मानसिक ताण, संदेह, संकोच ठेवू नये. दुधाची निर्मिती व दूध स्रवणे याक्रिया मेंदूच्या नियंत्रणाखाली असतात. गरोदरपणात वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते. प्रसुतीनंतर होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव कमी होतो. उतारवयातील हाडांचा ठिसूळपणा, स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होतो.बाळ जितके जास्त दूध पिईल तितके अधिक दूध निर्माण होते. काही मातांना स्वत:ला पुरेसे दूध येणार नाही अशी भिती वाटत असते व त्यामुळे त्याबरेचदा बाळाला सुरुवातीच्या काही महिन्यांमध्येच वरचे दूध व पाणी चालू करतात. परंतु यामुळे बाळ स्तनपान कमी करते. परिणामी आईला कमी दूध येते, बाळ सशक्त होत नाहीत. त्यामुळे बाळ मागेल तेव्हा स्तनपान करावे. -डॉ. अनिलकुमार कु-हाडे

 

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालय