शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पेट्रोल पंपावरील कामगारांनी एटीएम क्लोन करून लुटले ग्राहकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 20:15 IST

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोन करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सायबर पोलीस व भिंगार कॅम्प पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

अहमदनगर : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोन करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सायबर पोलीस व भिंगार कॅम्प पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

सूरज अनिल मिश्रा (वय २३) व धीरज अनिल मिश्रा (वय ३१, दोघे रा. टोकेवाडी, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे दोघे सख्खे भाऊ आहेत. पोलिसांनी या दोघांकडून २ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे दोघे आरोपी काही दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील आरणगाव येथील पेट्रोल पंपावर कामाला होते. पेट्रोल भरल्यानंतर ग्राहकांनी एटीएमच्या माध्यमातून पेमेंट दिल्यानंतर हे आरोपी त्यांच्याकडे असलेल्या स्कीमर मशीनच्या माध्यमातून ते एटीएम क्लोन करायचे. तसेच यावेळी ग्राहकाच्या एटीएमचा पिन नंबरही विचारून घ्यायचे. असे बहुतांश एटीएम कार्ड क्लोन केल्यानंतर या दोघांनी पेट्रोल पंपावरील काम सोडून दिले. क्लोन केलेल्या एटीएमचा डाटा वापरून बनावट कार्ड तयार करत आरोपींनी एटीएममधून पैसे काढण्यास सुरुवात केली. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस व सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपींचा शोध घेतला. या दोघा आरोपींना टोकेवाडी येथून जेरबंद करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना १९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, हेडकॉन्स्टेबल योगेश गोसावी, गोविंद गोल्हार पोलीस नाईक उमेश खेडकर, दिगंबर कारखिले, राहुल द्वारके, राहुल गुंडू अभिजीत अरकल, वासुदेव शेलार आदींच्या पथकाने तपास करून आरोपींना जेरबंद केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसCrime Newsगुन्हेगारी