शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीपूर्वी उड्डाणपुलाचे काम : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 11:38 IST

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि तीन वेळा भूमिपूजन झालेला नगर शहरातला उड्डाणपूल लवकरच मार्गी लागेल.

अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि तीन वेळा भूमिपूजन झालेला नगर शहरातला उड्डाणपूल लवकरच मार्गी लागेल. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पुलाचे कॉलम उभे राहिलेले दिसतील, अशी माहिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी दिली.गुरुवारी खासदार विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ नगर मतदारसंघातील प्रलंबित व नियोजित रस्ते आणि प्रशासकीय इमारतींच्या कामांचा विखे यांनी आढावा घेतला़ या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गो़ श़ मोहिते, कार्यकारी अभियंता राऊत, ए़ बी़ चव्हाण, ए़ एऩ राजगुरु आदी उपस्थित होते़बैठकीनंतर विखे यांनी जिल्हा परिषदेत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली़ ते म्हणाले, नगर शहरातील उड्डाणपूल, बाह्यवळण रस्ता, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत, आरटीओची इमारत याशिवाय जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्त्यांच्या प्रलंबित कामांसंदर्भात आढावा बैठकीत चर्चा केली़ मागील तीन वर्षात केंद्रीय राखीव निधीतून नगर जिल्ह्याला एक रुपयाही मिळाला नाही़ त्यामुळे हा निधी आणून जिल्हा मार्ग व राज्य मार्गांची कामे करण्यासाठी पाठपुरावा करु़ किमान १०० कोटी रुपये रस्त्यांच्या कामासाठी आणू़ त्यामुळे या कामांचे प्रस्ताव द्यावेत, असे या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचित केले आहे़नगर-मनमाड, नगर बाह्यवळण हे मार्गही राष्ट्रीय महामार्गांमध्ये घेतले आहेत़ नगर बाह्यवळण रस्त्याचे विळद घाट ते मनमाड रोडपर्यंत दुरुस्तीचे काम झाले आहे़ पुढील काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे़ बाह्यवळण रस्त्याचे काम मार्गी लागल्यानंतर सर्व वाहतूक बाह्यवळण मार्गे वळविण्यात येईल़ त्यानंतर नगरमधील उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आली़ यापुलासाठी ३६५ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे़ ठेकेदार नेमला आहे़ ८६ टक्के जमिनीचे अधिग्रहणही झाले आहे़ मात्र ९० टक्क्यांपेक्षा जास्त जमिनीचे अधिग्रहण व्हायला हवे, असा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा नियम आहे़ यश पॅलेस ते एसबीआय चौकापर्यंत जमीन अधिग्रहणाची गरज नाही़ तेथे फक्त साईडपट्ट्या अधिग्रहित करायच्या आहेत़ भूसंपादनासाठी ५२ कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिले आहेत़ उड्डाणपुलाच्या उर्वरित जमिनीच्या भूसंपादनासाठी मोजणी सुरु आहे़ मात्र, हे अधिग्रहण मागे राहिले तरी कामास प्रारंभ करण्याची मान्यता द्यावी, अशी मागणी आपण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार आहोत़ पावसाळी अधिवेशनात उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावणार आहे, असे विखे यांनी सांगितले़लोकप्रतिनिधी चोर नाहीतप्रशासन अनेकदा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही़ तीन दिवसांपूर्वी उड्डाणपुलाच्या आढावा बैठकीला महापौरांना बोलाविले़ तेव्हा त्यांना काम कोठे रखडले आहे, ते समजले़ जे काम एका फोनवर होणारे असते ते काम प्रशासनामुळे सहा महिने रखडले़ त्यामुळे यापुढे असे चालणार नाही़ प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णयप्रक्रियेत सहभागी करुन घेतले पाहिले़ प्रशासन काम करते अन् लोकप्रतिनिधी चोर आहेत, असे नाही़ आम्हाला लोकांनी लोकांच्या कामासाठी निवडून दिले आहे़ प्रशासनाकडून कामं करुन घेणं ही आमची जबाबदारी आहे़ आतापर्यंत लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले़ प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना विचारलं जात नाही, हे आता बंद झालं पाहिजे, अशा शब्दात खासदार विखे यांनी प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखे