आपण आपल्या मुलांना स्त्री स्वातंत्र्याची ओळख करून देत असतो, असे प्रतिपादन रयतच्या जनरल बाॅडी सदस्या रितू ॲबट यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी 'स्त्री शक्तीचा सन्मान होणे गरजेचे आहे' असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. रामदास बर्वे, जुनियर विभाग प्रमुख प्रा. सतीश शिर्के व सर्व महिला प्राध्यापक व विभागप्रमुख उपस्थित होते.
प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत डॉ. योगिता रांधवणे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. संगीता शेळके यांनी केले. डॉ. रंजना वर्दे यांनी आभार मानले.