शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

बाबुर्डीत जमिनीच्या वादातून महिला सरपंचांना कुर्‍हाडीने मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 17:52 IST

पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दोन्ही कुटुंबात जमिनीच्या वादातून रविवारी तुफान हाणामारी झाली. यात काठ्या,कुर्‍हाडीचा वापर करण्यात आल्याने सुभाष दिवटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

पळवे (जि. अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील दोन्ही कुटुंबात जमिनीच्या वादातून रविवारी तुफान हाणामारी झाली. यात काठ्या,कुर्‍हाडीचा वापर करण्यात आल्याने सुभाष दिवटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत आशा सुभाष दिवटे यांनी सुपा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यानुसार सहा जणांविरोधात विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबुर्डी येथील गवळी-दिवटे  यांच्यात अनेक वर्षांपासून जमीनीचा वाद आहे. ग्रामस्थांनी हा वाद बऱ्याच वेळा पंचकमिटी समोर ठेवला. मात्र वाद मिटू शकला नसल्याने त्यांचे रूपांतर रविवारी काठ्या कुर्‍हाडीने मारहाणीत झाले.

याबाबत सुपा पोलीस स्टेशन वरून  मिळालेली माहिती अशी की, रविवार दि.१५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आशा दिवटे यांनी बांधावरील झाड का पेटवून दिले असे विचारले असता सहा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस  त्यांच्या पतीस व सासू ठकूबाई मारुती दिवटे यांना काठी व कुर्‍हाडीने मारहाण करत जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ व दमदाटी केली. यावरून बाळू विठोबा गवळी, संगीता बाळू गवळी, निलेश बाळू गवळी, महेश बाळू गवळी, रीना महेश गवळी, प्रियंका निलेश गवळी सर्व रा.बाबुर्डी ता.पारनेर या सहा जणांविरोधात गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक बळप नेमणूक पारनेर पोलीस स्टेशन (अतिरिक्त कार्यभार सुपा पोस्ट), सहाय्यक पोलिस निरीक्षक कोसे, पोहे कॉन्स्टेबल आर. एस. पटेल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत.    पोलिसांकडून दंडीलशाहीआरोपी यांनी मारहाण करण्याअगोदर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर  आमच्या कुटुंबातील सदस्यांना कुर्‍हाडी ने मारहाण केली. यापूर्वी देखील सासूबाईंना मारहाण करण्यात आला आहे. आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता ते नातेवाईक आहेत.असे म्हणत आमच्यावर मोठ्या आवाजात बोलू लागले.घटना स्थळी जाऊन देखील कुठल्याही प्रकारे कारवाई केली नाही.तक्रारीची दखल न घेतल्यास जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहे.- आशा दिवटे, माजी सरपंच बाबुर्डी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी