शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

केडगावला ट्रक धडकेने महिला ठार, संतप्त नागरिकांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 17:06 IST

रस्त्याच्या कडेला रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या वृद्धेस लिंक रोडकडून नगरकडे येणा-या मालट्रकने चिरडले. या अपघातात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला.

केडगाव : रस्त्याच्या कडेला रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या वृद्धेस लिंक रोडकडून नगरकडे येणा-या मालट्रकने चिरडले. या अपघातात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुकवारी (दि.१०) दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान नगर-पुणे रोडवरील केडगावमधील भूषणनगर चौकात हॉटेल रंगोली समोर घडली. शांताबाई ताराचंद काळे (वय ६५, रा.निमगाव वाघा, ता.नगर) असे या मयत झालेल्या वृध्देचे नाव आहे. काळे या नगरकडे जाण्याकरीता भूषणनगर चौकात रंगोली हॉटेल जवळील रस्त्याच्या कडेला रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळेस लिंक रोडने नगरकडे भरधाव वेगात येणाºया मालट्रक (क्र.एम.एच.१६, ए.ई.-५७९७ ) चा धक्का लागून शांताबाई काळे या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या शेजारी असलेली आणखी एक महिला सुदैवाने बचावली असून गंभीर जखमी झाली आहे. अपघात होताच घटनास्थळावरील नागरिक मदतीकरीता धावले. नागरिकांनी ट्रक चालक सय्यद (पूर्ण नाव माहित नाही, रा.बीड) याला पकडून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. संतप्त नागरिकांनी यावेळी ट्रकच्या काचा फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक विजय पठारे, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह रमेश परतानी, राजू पठारे, राजू सातपुते, भरत गारुडकर हे घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती कोतवाली पोलीस ठाण्यास देण्यात आली. अपघात होताच पुणे महामार्गावर दुतर्फा वाहतूक ठप्प झाली. संतप्त नागरिकांनी दिवसा शहरातून येणाºया अवजड वाहनांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. दिवसा शहरातून अवजड वाहने जाण्यास बंदी असताना अवजड वाहने शहरात प्रवेश करतातच कशी? असा प्रश्न उपस्थित करुन केडगाव बायपास चौकात तसेच कल्याण बायपास चौक व भूषणनगर चौक येथे कायमस्वरुपी पोलीस कर्मचारी नेमावेत, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता प्रयत्न केले. यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातWomenमहिला