शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

भोजडेत विवाहितेची आत्महत्या; अंत्यसंस्कारावरून दोन गटात तणाव, पतीसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 19:52 IST

दुचाकी व सोफासेट घेण्यासाठी माहेरहुन २ लाख रूपये आणावेत म्हणुन पती प्रमोद बाळासाहेब सिनगर, सासु हिराबाई बाळासाहेब सिनगर व सासरे बाळासाहेब अहिलाजी सिनगर हे मयत प्रियंकाचा सतत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून, उपाशी पोटी ठेऊन शारीरिक व मानसिक छळ करीत होते.

कोपरगाव : विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यावरून मंगळवारी रात्री तालुक्यातील भोजडे येथे दोन गटात जोरदार संघर्ष होऊन गावात तणाव निर्माण झाला. या प्रकरणी पोलिसांनी मयत महिलेच्या पतीसह सासु, सास-या विरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.भोजडे येथे मयत प्रियंका (वय २३) या सासरी नांदत असताना दुचाकी व सोफासेट घेण्यासाठी माहेरहुन २ लाख रूपये आणावेत म्हणुन पती प्रमोद बाळासाहेब सिनगर, सासु हिराबाई बाळासाहेब सिनगर व सासरे बाळासाहेब अहिलाजी सिनगर हे त्यांचा सतत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून, उपाशी पोटी ठेऊन शारीरिक व मानसिक छळ करीत होते. या छळास कंटाळुन मयत प्रियंका सिनगर यांनी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता भोजडे शिवारातील विजय सिनगर यांच्या गट क्रमांक ३१०/४ मधील शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान ६ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृतदेह आढळुन आला. याप्रकरणी तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली. मात्र आत्महत्येविषयी त्यांच्या माहेरील मंडळीने संशय घेतल्याने मंगळवारी दुपारी औरंगाबादच्या सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करून रात्री साडे अकरा वाजता मृतदेह भोजडे गावात आणण्यात आला. मयताच्या माहेरील मंडळीने सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा घेतल्याने दोन गटात जोरदार संघर्ष होऊन काही काळ तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस निरीक्षक साहेबराव कडनोर फौजफाट्यासह गावात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत दोन गटात वाद सुरू होता. अखेर अंत्यविधी उरकण्यात आला. याप्रकरणी मयताची आई अनिता गोरख निरगुडे रा. पढेगाव चौकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतीसह सासू व सास-याविरूध्द गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर