शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

महिला व बालकल्याण अधिकारी विजयमाला माने चौकशीच्या फेऱ्यात

By | Updated: December 6, 2020 04:22 IST

जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी रात्री हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत कारमध्ये माने होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. ...

जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी रात्री हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत कारमध्ये माने होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. विशेष म्हणजे, जरे यांच्या हत्येनंतर माने यांनी पत्रकार बाळ ज. बोठे याला फोनवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर माने यांनी स्वत: कार चालवून जरे यांना दवाखान्यात पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माने यांचा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा आहे.

माने यांनी घटनेनंतर बोठे याला फोन करून माहिती दिली. तोच बोठे हत्याकांडाचा सूत्रधार निघाल्याने माने यांनी बोठे याच्याशी केलेला संपर्कही संशयाच्या फेऱ्यात आला आहे. दरम्यान, जरे यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, यामध्ये गळा चिरूनच हत्या झाल्याचे समोर आले आहे, तसेच जरे यांच्या खांद्याजवळही जखम झाल्याचे अहवालात नमूद आहे. जरे यांची हत्या करण्यासाठी वापरलेला चाकू मारेकऱ्यांकडून जप्त करण्यात आला आहे.

......

सागर भिंगारदिवेच्या घराची झडती, सीसीटीव्ही फुटेज जप्त

जरे यांच्या हत्याकांडात बाळ बोठे याचा साथीदार असलेल्या सागर भिंगारदिवे याच्या केडगाव येथील घराची शनिवारी पोलिसांनी झडती घेतली. घरात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज जप्त केले.

..................

जरे यांची बोठेविरोधात तक्रार

मयत रेखा जरे यांनी २२ डिसेंबर २०१८ रोजी नगर शहरातील कोतवाली पोलिसांना निवेदन देऊन बाळ बोठे याच्या विरोधात तक्रार केली होती. बोठे याने त्याच्या मोबाईलवरून जरे यांच्या मोबाईलवर संदेश पाठविला होता. हा संदेश आपली बदनामी करण्याच्या उद्देशानेच पाठविला असल्याचे जरे यांनी निवेदनात म्हटले होते.

....................

बोठेचा शोध लागेना

हत्याकांड घडवून आणल्यानंतर बोठे शहरातून फरार झाला. पोलिसांची पाच पथके त्याचा विविध ठिकाणी शोध घेत आहेत. मात्र, तो अद्याप सापडलेला नाही. पोलीस त्याच्या मित्रांवरही लक्ष ठेवून आहेत.

..............