शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वांबोरी चारीचे पाणी शेवटपर्यंत पोहोचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:15 IST

वांबोरी पाईप चारीचे पाणी अद्यापही पाथर्डी तालुक्यातील अखेरच्या टप्यातील गावांपर्यंत पोहोचलेले नाही.

अहमदनगर : वांबोरी पाईप चारीचे पाणी अद्यापही पाथर्डी तालुक्यातील अखेरच्या टप्यातील गावांपर्यंत पोहोचलेले नाही. काही तलावांत दिवसातून दोन तास पाणी पडते व नंतर पुन्हा गुडूप होते, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. प्रशासनाच्या आशीर्वादाने पाणी चोरी होत असल्यानेच अखेरपर्यंत पाणी पोहोचत नाही, असा आरोप आहे.वांबोरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्यात पोहोचत नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला होता. यासंदर्भात मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे व पाथर्डीचे तहसीलदार यांनी या गावांत भेटी देऊन पाणी पोहोचविण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनानुसार पाणी पोहोचलेले नाही, अशी गावांची तक्रार आहे. पांगरमलपर्यंत पाणी आले. तेथून पुढे दोन चाºया जातात. त्यापैकी मिरी व शंकरवाडी या परिसरातील चारीचे पाणी या गावांतील तलावांपर्यंत पोहोचलेले नाही. मढीच्या दिशेने आलेल्या चारीचे पाणी केवळ लोहसरपर्यंत आलेले आहे. त्यापुढे जोहारवाडी, भोसे, करंजी, घाटशिरस, तिसगाव, शिरापूर या भागात पाणी आलेले नाही. काही तलावांत दिवसातून फक्त एक ते दोन तास पाणी पडते.चारीवर मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी सुरु आहे. जलसंपदा विभागाने कंत्राटी कामगार देखरेखीसाठी नियुक्त केले असून ते पाणीचोरीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी पाणीचोरांकडून आर्थिक मोबदला घेऊन त्यांना संरक्षण दिले जात असल्याचाही संशय आहे.पाणीचोरांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी या गावांनी केली आहे. बाळासाहेब अकोलकर, मच्छिंद्र सावंत, बंडू पाठक, राहुल गवळी, अभिजीत शिंदे, संतोष आठरे, राजेंद्र अकोलकर, सागर पाठक, भुजंग शिंदे, संदीप अकोलकर, संभाजीराव वाघ, भगवान मरकड, विष्णू मरकड, संभाजी सरोदे, भाऊसाहेब पाठक, बंडू अकोलकर, विष्णू मरकड, भगवान मरकड, सचिन मरकड या शेतकºयांनी सोमवारी मोरे यांची भेट घेऊन पाणी पोहोचविण्याची मागणी केली आहे.पाणी न पोहोचल्यास शेतकरी कोणत्याही क्षणी आंदोलन पुकारतील, असे शेतकºयांनी सांगितले. शासनाने फसवणूक केल्याने कुणी शेतकºयाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असा इशाराही शेतकºयांच्या शिष्टमंडळाने दिला आहे. पाणी चोरांवर गुन्हे का दाखल होत नाहीत? असा प्रश्न या गावांनी केला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर