अहमदनगर : नगर शहरातील बुरुडगाव रोडवरील भोसले आखाडा येथून दहा दिवसांपूर्वी एक विवाहित महिला आपल्या दोन मुलांसह बेपत्ता झाली आहे.
संगीता सतेश जाधव (वय ३५), अकिल सतेश जाधव (वय १०) व अविनाश सतेश जाधव (वय ७) अशी बेपत्ता झालेल्या तिघांची नावे असून, याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात या महिलेची सासू सुशीला भानुदास जाधव यांनी २३ एप्रिल रोजी मिसिंगची तक्रार दाखल केली आहे.
२१ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता संगीता ही दोन मुलांसमवेत तिच्या माहेरी पारनेर तालुक्यातील बाडगाव येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. मात्र, ती माहेरी पोहोचली नाही. याबाबत संगीता व तिच्या दोन मुलांचा नातेवाईकांकडे व इतर ठिकाणी शोध घेतला असता, ती सापडली नाही, असे याप्रकरणी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संगीता व तिची दोन मुले कोठे आढळल्यास कोतवाली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.