अहमदनगर : नगर शहराजवळील मांजरसुंबा गड येथे एका महिलेने उंच टेकडीवरुन खोल दरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या महिलेला पोलीस वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांवरच दगडफेक करीत या महिलेने स्वत:ला खोल दरीत झोकून दिले. उपचारादरम्यान महिलेचा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.स्वाती मंगेश भोंडगे (वय २४, रा. शिर्डी) असे या महिलेचे नाव आहे. संबंधित महिला प्रसुतीसाठी माहेरी मांजरसुंबा गड येथे आली होती. काही वर्षापूर्वी तिचे लग्न शिर्डी येथील भोंडगे परिवार झाले होते. महिनाभरापूर्वी ती मांजरसुंबा गड येथे प्रसुतीसाठी आली होती. पाच दिवसापूर्वी तिची प्रसुती होऊन तिला मुलगा झाला आहे. तिचे माहेरचे नाव स्वाती तुकाराम वाघमारे असे आहे.ती आत्महत्या करण्यासाठी गडावरील एका टेकडीवर गेली होती. ही माहिती गावातील लोकांना समजताच लोकांनी पोलिसांनी दूरध्वनीवरुन माहिती दिली़ एमआयडीसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिला तात्काळ सिव्हील रुग्णालयात दाखल केले असून, तिची प्रकृती गंभीर आहे.
खोल दरीत उडी मारलेल्या मांजरसुंबा गड येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:40 IST
नगर शहराजवळील मांजरसुंबा गड येथे एका महिलेने उंच टेकडीवरुन खोल दरीत उडी मारुन आत्महत्या केली. विशेष म्हणजे या महिलेला पोलीस वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांसमोरच या महिलेने स्वत:ला खोल दरीत झोकून दिले.
खोल दरीत उडी मारलेल्या मांजरसुंबा गड येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
ठळक मुद्दे नगर शहराजवळील मांजरसुंबा गड येथे एका महिलेने उंच टेकडीवरुन खोल दरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या महिलेला पोलीस वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांसमोरच या महिलेने स्वत:ला खोल दरीत झोकून दिले.स्वाती महेश बंडगे (रा. शिर्डी) असे या महिलेचे नाव आहे.पोलिसांनी तिला तात्काळ सिव्हील रुग्णालयात दाखल केले असून, तिची प्रकृती गंभीर आहे.