शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

केडगावच्या पोलीस ठाण्याला मुहूर्त मिळणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 09:45 IST

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाने सारे राज्य हादरून गेले. नेहमीच संवेदनशील असणा-या केडगावचा चेहरा यामुळे समोर आला. राजकीय हाणामा-या येथे नवीन नाहीत. पण राजकीय संघर्ष थेट दिवसा ढवळ्या गोळीबारावर जाऊन पोहचला आहे. नगरचे मोठे उपनगर असूनही येथील कायदा-सुव्यस्थेचे सर्वत्र धिंडवडे निघाले. नगर शहराच्या वाढत्या विस्तारामुळे केडगावसह आसपासच्या काही गावांचे मिळून केडगावला स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव गेल्या १८ वर्षांपासून राजकीय व प्रशासकीय पाठपुराव्याभावी धूळखात पडून आहे.

ठळक मुद्दे १८ वषार्पासूनचा प्रस्ताव गुन्हेगारी, गुंडगिरीचा कळस राजकीय व प्रशासकीय अनास्था

योगेश गुंडकेडगाव : केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाने सारे राज्य हादरून गेले. नेहमीच संवेदनशील असणा-या केडगावचा चेहरा यामुळे समोर आला. राजकीय हाणामा-या येथे नवीन नाहीत. पण राजकीय संघर्ष थेट दिवसा ढवळ्या गोळीबारावर जाऊन पोहचला आहे. नगरचे मोठे उपनगर असूनही येथील कायदा-सुव्यस्थेचे सर्वत्र धिंडवडे निघाले. नगर शहराच्या वाढत्या विस्तारामुळे केडगावसह आसपासच्या काही गावांचे मिळून केडगावला स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव गेल्या १८ वर्षांपासून राजकीय व प्रशासकीय पाठपुराव्याभावी धूळखात पडून आहे.केडगावचा वाढता पसारा, गुन्हेगारी,राजकीय संवेदनशीलता, अवैध धंद्याचा बोलबाला, राज्यमार्ग, बाह्यवळण रस्ता यामुळे केडगाव उपनगराला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा मिळणे आवश्यक असूनही हा प्रश्न वषार्नुवर्षे थिजत पडला आहे. सुमारे ८० हजार लोकवस्तीचे नगर शहराचे उपनगर असणारे केडगाव आता झपाट्याने विस्तारत आहे. सन २००० मध्ये केडगावसह आसपासची नगर तालुक्यातील गावे मिळून केडगावला स्वतंत्र पोलीस ठाणे मिळावे, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाने राज्य शासनाला पाठवला. याला आता १८ वर्षे लोटली आहेत. यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आले. केडगावच्या प्रस्तावाची फक्त चर्चाच झाली. राजकीय पाठपुराव्याचा अभाव आणि प्रशासकीय पातळीवरील ढिलाई यामुळे अजूनही हा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडून आहे. सध्या केडगाव नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचा विस्तार वाढत असून जवळपास निम्मे शहर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट आहे. यामुळे कोतवाली पासून ५ किलोमीटर अंतरावर असणा-या केडगावमधील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मर्यादा येत आहेत. केडगाव मध्ये पोलीस चौकी असून तेथे चार-पाच पोलीस कर्मचा-याची नेमणूक आहे. यामुळे एवढ्या मोठ्या भागातील गुन्हेगारीवर वचक ठेवणे जिकीरीचे बनत आहे. राजकीयदृष्ट्या केडगाव नेहमी संवेदनशील म्हणून ओळखले जाते. निवडणुकीच्या काळात अनेक वेळा तणावाची स्थिती येथे पाहवयास मिळते. यातून अनेकदा हाणामारी झालेल्या आहेत. आताच घडलेले दुहेरी हत्याकांड हे ही याच कारणांनी घडल्याचे समोर येत आहे. या भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. राज्य मार्ग व बाह्यवळण रस्ता या परिसरातून जात असल्याने अपघात आणि रस्तालूट यांच्या गुन्ह्यांची आकडेवारी आता वाढू लागली आहे. यासर्व परिस्थितीमुळे केडगाव सारख्या उपनगरात स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात येणे आवश्यक असताना याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने हा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडत पडला आहे.

इतर उपनगरात पोलीस ठाणे केडगावात का नाही ?नगर शहराच्या भिंगार, सावेडी, नागापूर या उपनगरात स्वतंत्र पोलीस ठाणे अस्तित्वात आहे. मात्र केडगाव झपाट्याने वाढत असताना या उपनगराचा समावेश अजून शहरातील पोलीस ठाण्यात आहे. शहर व केडगाव मधील अंतर आणि शहराच्या पोलीस ठाण्याचा वाढता आवाका पाहता केडगावलासुध्दा इतर उपनगरांप्रमाणे स्वतंत्र पोलीस ठाणे असावे अशी मागणी होऊ लागली आहे.

म्हणून तरी पोलीस पोहचले लवकरकेडगावमध्ये ज्या दिवशी दुहेरी हत्याकांड झाले त्या दिवशी येथील पोटनिवडणुकीचा निकाल होता. यामुळे केडगाव पोलीस चौकीत बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची मोठी कुमक होती. यामुळे घटना घडल्यानंतर लगेच पोलीस घटनास्थळी पोहचले. अन्यथा नगर शहरातून पोलीस येण्यात बराच वेळ गेला असता.

प्रथमच केडगाव चौकित फिर्याद दाखलकेडगाव दुहेरी हत्याकांड झाल्यांनतर प्रथमच येथील पोलीस चौकीत फिर्याद दाखल करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा स्वत: उपस्थित होते. यापूर्वी फिर्याद देण्यास कोतवाली पोलीस ठाणे गाठावे लागायचे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड