शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांवरील वीज बिलाचा भार उतरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 13:50 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या असून, विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे़. मात्र, या वाढलेल्या वीज बिलाच्या भारामुळे शाळांचे कंबरडे मोडले आहे़. मात्र, लवकरच १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींमार्फत हे वीज बिल भरले जाऊ शकते़. त्यामुळे वीज बिलाच्या भारातून शाळांची सुटका होऊ शकते़.

साहेबराव नरसाळे ।  अहमदनगर : जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या असून, विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे़. मात्र, या वाढलेल्या वीज बिलाच्या भारामुळे शाळांचे कंबरडे मोडले आहे़. मात्र, लवकरच १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींमार्फत हे वीज बिल भरले जाऊ शकते़. त्यामुळे वीज बिलाच्या भारातून शाळांची सुटका होऊ शकते़.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे गेल्या दोन वर्षांपासून शाळांचे वीज बिल १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरले जावे, अशी मागणी होत होती़. त्यासाठी शिक्षकांकडून पाठपुरावाही सुरु होता़. शिक्षकांच्या या पाठपुराव्याला यश येत असल्याचे दिसून येत आहे़. १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना थेट निधी वर्ग केला जातो़. या निधीचा विनियोग कसा करायचा, याबाबत मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने ग्रामपंचायतींना लागू केल्या आहेत़. तसेच ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक आराखड्यातही ग्रामपंचायतींनी शिक्षण, आरोग्य यासारख्या महत्वाच्या बाबींवर प्राधान्याने खर्च करावा, असे सरकारने निर्देश दिलेले आहेत़. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ४५ (३) मधील मार्गदर्शक तत्वांनुसार ग्रामपंचायतींना मिळणारा शासकीय निधी किंवा ग्रामपंचायतींचा स्वनिधी यातून शिक्षणावर खर्च करण्याबाबत सुचविण्यात आले आहे़. या कलमाचा आधार घेऊन ग्रामपंचायतींनी शाळांचे वीज बिल भरावे, यासाठी जिल्हा परिषदेकडून हालचाली सुरु आहेत़. सरकारकडून शाळांना सादील निधी मिळतो़ हा निधी अत्यंत तुटपुंजा असतो़. त्यातून वीज बिल व इतर अनुषंगिक खर्च भागविणे अवघड होते़. त्यामुळे १४ व्या वित्त आयोगातून हे वीज बिल भरल्यास विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमांचा वापर करुन दर्जेदार शिक्षण घेण्याची सुविधाही अखंडित मिळू शकते़. शाळा डिजिटल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून अधिक परिणामकारक अध्यापन करता येते़. मात्र, वीज बिल भरण्यासाठी शाळांना वेगळी तरतूद करण्यात आलेली नाही़. त्यामुळे डिजिटल शिक्षणात अडचणी येतात़ भरमसाट वीज बिल भरणे अवघड होते़. त्यामुळे शिक्षक संघाने मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे पाठपुरावा केला होता़. याबाबत जिल्हा परिषदेने सकारात्मकता दाखवून त्यासंदर्भात आदेश काढण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागाला केल्या आहेत, असे प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी सांगितले.     

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाAhmednagarअहमदनगर