शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या सभेला संचालक उपस्थित राहणार का ? : पोलीसांचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 14:53 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटपप्रकरणी अहमदनगर शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व संचालक मंडळ व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल आहे.

अहमदनगर : बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटपप्रकरणी अहमदनगर शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व संचालक मंडळ व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल आहे. या बँकेची आज (दि़२८) सायंकाळी ५ वाजता सावेडी येथील माऊली सभागृहात सर्वसाधारण सभा होत आहे. आता या सभेला संचालक मंडळ आणि अधिकारी उपस्थित राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सभेला उपस्थित राहिले तर पोलीसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.सहकारी डॉक्टरांची फसवणूक करुन व त्यांच्या स्वाक्ष-या असलेली बनावट कागदपत्रे तयार करुन निलेश शेळके या डॉक्टरने येथील शहर सहकारी बँकेतून १७ कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. बँकेचे संचालक, अधिकारी, हॉस्पिटलला मशिनरी पुरवणाºया एजन्सी यांनी शेळके याच्याशी संगनमत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे कोतवाली पोलीस स्टेशनला शेळकेसह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़ पोलीस निरिक्षक प्रवीण भोसले हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.कर्ज घोटाळ्याप्रकरणी डॉ. रोहिणी भास्कर सिनारे (रा. राहुरी), डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे (रा. श्रीरामपूर) व डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांनी स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या आहेत. फिर्यांदीपैकी प्रत्येकाची ५ कोटी ७५ लाख रूपयांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे. याप्रकरणी डॉ. निलेश शेळके (रा. स्रेह बंगला, माणिकनगर, अहमदनगर) याच्यासह शहर सहकारी बँकेचे अध्यक्ष सुभाष चंदनमल गुंदेचा, उपाध्यक्ष सुजित श्रीकांत बेडेकर, संचालक मुकुंद घैसास (मयत), अशोक माधवराव कानडे, सुनील रामकृष्ण फळे, रावसाहेब जिजाबा अनभुले (मयत), सतीश दत्तात्रय अडगटला, मच्छिंद्र लक्ष्मण क्षेत्रे, संजय विठ्ठल घुले, गिरीश मुकुंद घैसास, डॉ़ विजयकुमार माणकचंद भंडारी, शिवाजी अशोकराव कदम, लक्ष्मण सहदेव वाडेकर(मयत), रेश्मा राजेश आठरे (चव्हाण), नीलिमा विश्वनाथ पोतदार, बाळासाहेब विठ्ठलराव राऊत, संजय प्रल्हाद मुळे यांच्यासह बँकेचे अधिकारी जवाहर हस्तीमल कटारिया, दिनकर यशवंत कुलकर्णी व कर्ज विभागाचे अधिकारी तसेच सी़ए़ विजय विष्णूप्रसाद मर्दा, बी़पी़ भागवत, निर्मल एजन्सीचे योगेश मालपाणी, जगदीश कदम, आऱटी़ कराचीवाला, मधुकर वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. बँकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यावरच गुन्हा दाखल असल्याने सर्वसाधारण सभेवर पोलीसांचे सावट राहणार आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस