शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मटण न केल्याने पत्नीस पेटविले; श्रीरामपूरच्या पटेलवाडीची घटना, महिलेवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 19:39 IST

पत्नीने जेवणामध्ये मटण केले नाही म्हणून पतीने अंगावर रॉकेल टाकून पत्नीस पेटवून दिल्याची घटना पटेलवाडी (ता. श्रीरामपूर) येथे घडली. गंभीररीत्या भाजलेल्या महिलेस साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

श्रीरामपूर : पत्नीने जेवणामध्ये मटण केले नाही म्हणून पतीने अंगावर रॉकेल टाकून पत्नीस पेटवून दिल्याची घटना पटेलवाडी (ता. श्रीरामपूर) येथे घडली. गंभीररीत्या भाजलेल्या महिलेस साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि़ २९) गुन्हा दाखल करण्याता आला आहे.भाजलेल्या महिलेचे नाव आशाबाई नाना पारखे (वय ४०, रा.पारखेवस्ती, पटेलवाडी) असे आहे. पोलिसांनी महिलेचा रुग्णालयात जबाब नोंदवून आरोपी पती नानू चिलखू पारखे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता आरोपी नानू हा घरी आल्यानंतर जेवणासाठी मटण का केले नाही? याचा राग धरून पत्नी आशाबाई हिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत घरातील रॉकेलच्या कॅनमधील रॉकेल अंगावर ओतून चुलीतील जळत्या लाकडाने पेटवून देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन भाजलेल्या महिलेची भेट घेऊन जबाब नोंदविला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरahmednagar policeअहमदनगर पोलीस