शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये पोलीस पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 12:13 IST

स्वत:च्या मुलीच्या उपचारासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीला वारंवार त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस विकास नानाभाऊ सातपुते याच्यासह सासू शोभा नानाभाऊ सातपुते, दिर प्रकाश नानाभाऊ सातपुते, प्रियंका प्रकाश सातपुते, मामा सासरे सतीष गायकवाड यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देमाहेरहून एक लाख रुपये आणण्याचा तगादा

अहमदनगर : स्वत:च्या मुलीच्या उपचारासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीला वारंवार त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस विकास नानाभाऊ सातपुते याच्यासह सासू शोभा नानाभाऊ सातपुते, दिर प्रकाश नानाभाऊ सातपुते, प्रियंका प्रकाश सातपुते, मामा सासरे सतीष गायकवाड यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरु आहे. विकास सातपुते हे तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.सासरच्या त्रासाला कंटाळून प्रणाली विकास सातपुते यांनी बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रणाली यांची आई विजयश्री दगडू उजागरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, प्रणाली उजागरे यांचे ४ वर्षापुर्वी पाईपलाइन रोड येथील गावडे मळ््यातील पोलीस असणारे विकास नानाभाऊ सातपुते यांच्याशी लग्न झाले. या दांपत्याला अडीच वर्षाची शौर्या नावाची मुलगी आहे. मुलगी झाल्यानंतर नव-यासह सासरच्या मंडळीनी प्रणालीस त्रास देण्यास सुरुवात केली. ‘तुला मुलगी झाली असून ती एका हाताने अपंग आहे. तुझ्या मुलीच्या औषधोपचार करण्यासाठी आई-वडीलांकडून घेऊन ये’ अशी सातत्याने मागणी करत होते. माहेरच्या लोकांनी पैसे न दिल्यास प्रणाली व मुलगी शौर्या हीस सासरची मंडळी त्रास देत असत. शौर्यांच्या हाताच्या आॅपरेशनसाठी पती विकास सातपुते याने सासरच्या मंडळीकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती. ‘तुम्ही आजच्या आज पैसे द्या, मला माझे घरचे लोक खूप त्रास देत आहेत, तुम्ही ताबडतोब पैसे घेऊन घरी या’ असे १० एप्रिल २०१८ रोजी प्रणालीने वडील दगडू उजागरे यांना फोनवरुन कळविले. त्यानंतर वडील उजागरे यांनी प्रणालीच्या घरी जाऊन घरच्यांना समजावून सांगितले होते. तसेच आज पैसे देतो असेही यावेळी सांगितले होते. मात्र तत्पुर्वीच प्रणाली हिने छळाला कंटाळून बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस