शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

विखे पिता-पुत्र भाजपाच्या वाटेवर ?

By सुधीर लंके | Updated: February 24, 2019 12:03 IST

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उमेदवार तरी लवकर ठरतात अशी अवस्था लोकसभेची झाली आहे. नगर जिल्ह्यात तर सर्वच पक्षांनी आपले उमेदवार गुलदस्त्यात ठेवत मतदारांना बुचकळ्यात टाकले आहे.

सुधीर लंकेअहमदनगर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उमेदवार तरी लवकर ठरतात अशी अवस्था लोकसभेची झाली आहे. नगर जिल्ह्यात तर सर्वच पक्षांनी आपले उमेदवार गुलदस्त्यात ठेवत मतदारांना बुचकळ्यात टाकले आहे. सुजय विखे हे एकमेव आहेत ज्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. अर्थात त्यांनी स्वत:च स्वत:ची उमेदवारी जाहीर केली. ते नेमके कुणाचे? काँग्रेसचे की भाजपचे ? की ऐनवेळी माघार? हाही गोंधळ आहे.नगर जिल्ह्यात ‘अहमदनगर’ व ‘शिर्डी’ हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. सध्या या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे भाजप व सेना यांचे खासदार आहेत. युतीला पराभूत करुन आपला झेंडा रोवण्याचा दोन्ही काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र, या पक्षांची बांधणी पाहिली तर हे चित्र तेवढे सोपे नाही.खासदार हा जनतेतून निवडायचा असतो घराण्यांतून नाही, हे तत्त्वच आता बाद झाले आहे. राजकीय पक्षांनीच हे तत्व गुंडाळून ठेवले. अहमदनगर मतदारसंघात आजवर अनेकदा या निवडणुकीत मोठी घराणी समोर आली. याहीवेळचे चित्रही अपवाद नाही. निवडणुकीची तयारी करणाऱ्यांत आणि इच्छुकांतही घराणीच पुढे आहेत. गत दोन वर्षे सुजय विखे तयारी करत आहेत. आरोग्य शिबिरे घेण्याच्या निमित्ताने त्यांनी त्याच मांडवात आपला राजकीय प्रचार करुन घेतला. त्यांच्याकडे विखे पाटील फाउंडेशनचे नेटवर्क आहे. वडील विरोधीपक्षनेते तर आई जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत. ही सर्व ताकद त्यांनी पद्धतशीर वापरली. अहमदनगर मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. असे असतानाही सुजय यांनी जाहीरपणे खासदारकीचा प्रचार केला. एकाअर्थाने त्यांनी राष्टÑवादीला अगोदरपासूनच गृहीत धरत बाजूला फेकले. ‘राष्ट्रवादी’ नाही मीच उमेदवार असणार, विखे ठरवतील तेच होणार, असेच त्यांनी सूचविले. यातून राष्ट्रवादी ‘डॅमेज’ झाली. राष्ट्रवादी लढणार नाही, असा संदेशही गेला. राष्ट्रवादीच्या एकाही स्थानिक नेत्याला विखे यांची ही चाल ओळखता आली नाही. किंवा विखे यांचेसोबत पंगा नको म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.आम्ही मतदारसंघ सोडणार नाही, असे राष्ट्रवादी सांगते. मात्र, आपला उमेदवार ते सांगत नाहीत. त्याऊलट ‘मी निवडणूक लढणार. पक्ष नंतर सांगतो’, असे सुजय विखे ठासून सांगतात. राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे नेते व त्यांच्या मुलाची कुठलाही झेंडा हाती घेण्याची भाषा हे विसंगत चित्र आहे. मात्र, यावर दोन्ही कॉंग्रेसपैकी कोणीही बोलले नाही. यातून राष्ट्रवादीला गोंधळात टाकण्यात विखे यशस्वी झाले. तरीही शरद पवार काँग्रेससाठी अर्थात विखेंसाठी मतदारसंघ सोडतील असे दिसत नाही. पवार व विखे परिवार यांचे फारसे जमत नाही. राष्ट्रवादीने मतदारसंघ सोडला नाही तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्याचा पर्याय सुजय यांच्यासमोर आहे. मात्र, त्यासही पवार राजी होतील असे दिसत नाही. तसे असते तर आत्तापर्यंत हा निर्णय झाला असता. तसे घडलेच तर राधाकृष्ण विखे यांचे काँग्रेसमधील राजकारण अडचणीत येईल. सुजय अपक्ष लढले तर राष्ट्रवादीचा उमेदवार अडचणीत येईल. त्याचा परिणाम थेट दोन्ही काँग्रेसच्या आघाडीवर होईल. उद्या विधानसभेला राष्ट्रवादीही शिर्डी मतदारसंघात थेट हस्तक्षेप करेल. त्यामुळे विखे म्हणत असले तरी त्यांच्यासाठी अपक्ष उमेदवारीही सोपी नाही.सर्वात शेवटचा पर्याय उरतो. तो विखे यांच्या पक्षांतराचा. भाजपचे दिलीप गांधी यांची उमेदवारी बदलली जाईल अशी चर्चा आहे. भाजपकडे उमेदवारीसाठी राम शिंदे, भानुदास बेरड ही नावे आहेत. सुजय विखे हे भाजपात आले तर मुख्यमंत्र्यांना ते हवेच असणार. मात्र एकटे सुजय नाही तर राधाकृष्ण विखे यांनाही भाजपात जावे लागेल.सुजय भाजपात गेल्यावर त्यांचा खासदारकीचा मार्ग सोपा होईल. मात्र, शिर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे राधाकृष्ण विखे यांच्यासमोर थेट आव्हान उभे करतील. विखेही मग संगमनेरात लक्ष घालतील. विखे भाजपात गेल्यास थोरात यांना दोन्ही कॉंंग्रेस प्रचंड ताकद देईल.राष्ट्रवादीची अशीही परिक्रमाराष्ट्रवादीचा प्रत्यक्ष प्रचार सुरू झालेला नाही. मात्र वेगवेगळ्या उमेदवारांची नावे चर्चेत आणून त्यांनी पूर्ण अहमदनगर मतदारसंघाला वळसा घातला. शेवगावचे नरेंद्र व चंद्रशेखर घुले, पाथर्डीचे प्रताप ढाकणे, नगरचे अरूण जगताप व डॉ. सर्जेराव निमसे, पारनेरचे दादा कळमकर अशा सर्व नावांची राष्ट्रवादीने चर्चा केली. आता श्रीगोंद्याच्या अनुराधा नागवडे चर्चेत आल्या आहेत. यातून राष्ट्रवादीचे हसू होत आहे. सगळेच उमेदवार पवार यांनी मला शब्द दिल्याचे सांगत आहेत. नागवडे यांचे नाव चर्चेत कसे आले? हाही प्रश्नच आहे. ही आमदार राहुल जगताप यांची खेळी मानली जाते. कारण नागवडे लोकसभेचे उमेदवार झाले तर जगताप यांचा विधानसभा उमेदवारीचा मार्ग पुन्हा मोकळा होतो.विखेंचे दबावतंत्रविखेंनी उमेदवारीसाठी प्रेशर पंप वापरला. ते राष्ट्रवादीवर दबाव आणण्यात यशस्वी झाले आहेत मात्र सर्व शक्यता बघितल्या तर विखे यांचा मार्ग एवढा सुकर दिसत नाही. मतदारसंघ काँग्रेसला सुटला अथवा ते भाजपात गेले तरच त्यांची लढत सोपी आहे. अन्यथा त्यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसतात.सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे दिवस संपलेऐनवेळच्या निवडणुका या फक्त पैसा व पाठिशी कारखाने, घराणे असलेले नेतेच लढवू शकतात. काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बहुधा अशाच निवडणुका हव्या आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे दिवस आता संपले आहेत. जे अहमदनगर मतदारसंघात आहे. तेच शिर्डीत आहे. तेथेही दोन्ही काँग्रेसचे काहीच निश्चित नाही. तेथेही अनेक उमेदवारांचे ऐन निवडणुकीतच लँडिंग झाले.विखे भाजपचे उमेदवार?लोणी येथे शनिवारी विखे समर्थक कार्यकर्त्यांची बैठक झाल्याची चर्चा आहे. या बैठकीत राष्टÑवादी मतदारसंघ सोडणार नसेल तर भाजपात जाण्याचा आग्रह काही कार्यकर्त्यांनी विखे यांना केल्याची चर्चा आहे. विखे यांना तिकिट मिळणार नसेल तर आम्ही कॉंग्रेस सोडू, असा इशारा पारनेरच्या कार्यकर्त्यांनीही दिला आहे. यावरुन सुजय विखे भाजपात जातील की काय? अशीही चर्चा सुरु झाली आहे. सुजय विखे यांनी कोणतेही तिकीट घेण्याचे भाष्य यापूर्वीच केले आहे.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील