शहरं
Join us  
Trending Stories
1
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
2
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
3
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
4
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
5
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
6
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
7
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
8
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
9
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
10
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
11
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
12
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
13
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
14
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
15
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
16
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
17
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
18
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
19
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
20
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
Daily Top 2Weekly Top 5

गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

------------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद असून, तालुक्यातून गावांत ...

-------------------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद असून, तालुक्यातून गावांत अजूनही बस सुरू झालेली नाही. गावात बस येत नसल्याने ग्रामस्थांना शहरात येण्यासाठी खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बससेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्य परिवहन मंडळाने आंतरजिल्हा, परराज्यातील लांब आणि मध्यम पल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहरातून तालुक्याला बस धावू लागली आहे. परंतु, तालुक्यातून गावाकडे जाणाऱ्या बस बंद आहेत. दुसरी लाट ओसरल्यानंतर मध्यंतरी ग्रामीण भागातील बस सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. एसटीला प्रति किलोमीटरसाठी सुमारे २२ रुपये खर्च येतो. तुलनेत प्रवासी मिळत नाहीत. त्यात शाळा, महाविद्यालयेही बंद आहेत. त्यामुळे प्रवासी मिळत नसल्याने गावातील बससेवा बंद आहे. तालुका मुख्यालयातून अनेक गावांत मुक्कामी बस जात होत्या. परंतु, त्यात आता बंद करण्यात आलेल्या आहेत. तोट्यातील फेऱ्या महामंडळाने बंद केल्या असून, शाळा महाविद्यालये सुरू झाल्यानंतर गावातील एसटीही सुरू केली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

....

जिल्ह्यातील एकूण आगार

११

....

एकूण बसेस

५६५

...

एकूण फेऱ्या

९००

......

बंद असलेल्या फेऱ्या

९००

......

खेडेगावात जाण्यासाठी टमटमचा आधार

ग्रामीण भागातील बसच्या फेऱ्या बंद आहेत. बस बंद असल्याने प्रवासासाठी ग्रामस्थ खासगी वाहनांचा वापर करीत आहेत. बस नसल्याने खासगी वाहन चालकांची मनमानी सुरू असून, वारेमापपणे भाडेवाढ करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक सध्या ग्रामीण भागात सुरू असल्याचे पहायला मिळते.

......

- कोरोनाआधी गाव तिथे बस सुरू होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी बससेवा बंद करण्यात आली. दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक गावांत फेऱ्या सुरू करण्यात आल्या. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. शाळा बंद असल्याने प्रवाशी मिळत नसल्याने गावातील बस बंद आहेत.

- विजय गिते, विभाग नियंत्रक

...