शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोण आठवले? मी ओळखत नाही - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 03:45 IST

मला राखीव मतदारसंघाची गरज नाही. कोण रामदास आठवले? मी ओळखत नाही. आपण बाळ ठाकरे आहोत. अजून खेळ सुरू व्हायचा आहे. मीच सबसे बडा खिलाडी आहे, असा दावा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

कोपरगाव - मला राखीव मतदारसंघाची गरज नाही. कोण रामदास आठवले? मी ओळखत नाही. आपण बाळ ठाकरे आहोत. अजून खेळ सुरू व्हायचा आहे. मीच सबसे बडा खिलाडी आहे, असा दावा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीचा खेळ आहे़ प्रत्यक्षात शेतकºयांच्या पदरी काहीही पडलेले नाही. त्यामुळे लोकांचा भाजप सरकारवरील विश्वास उडाला आहे. भाजप सरकारने गॅस सबसिडीच्या ४० हजार कोटी रुपयांचे काय केले? याचा हिशेब अजून नाही. अर्थसंकल्पात शेतकºयांना दीडपट भाव वाढवून दिला. पण शेतीमूल्यात ती रक्कम प्रतिवर्धित झालेली नाही तर पुन्हा महागाईचा भडका उडेल. मागच्या वेळी ८५ हजार कोटी क्रुड तेलाचे वाचले होते. गॅस सबसिडी सोडल्याने ४० हजार कोटींचा फायदा झाला होता. तेव्हा अर्थव्यवस्था जेमतेम चालली.मंदीची लाट असल्याने सरकारचे उत्पन्न घटले८ लाख कोटींनी बँका तोट्यात आहेत. त्यांचे पैसे भरून देण्याचे सरकारचे धोरण आहे. एका बाजूला बँकांमधून पैसा काढायचा, तर दुसºया बाजूला माफ करायचा. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. देशभरात खरेदी करणारी यंत्रणा उभी करण्यासाठीचे अनुदान या अर्थसंकल्पात दिसत नाही, अशी टीका आंबेडकर यांनी केली.यावर्षी मंदीची लाट असल्याने सरकारचे उत्पन्न घटले. मात्र खर्च तसाच राहिला. मागील वर्षीची तफावत यंदा ३२ टक्क्यांनी वाढली. त्यामुळे सरकारला बाजारातून पैसे उभे करावे लागतील. पण ते आणायचे कोठून?

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRamdas Athawaleरामदास आठवलेAhmednagarअहमदनगर