शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

टँकर गेले कुण्या गावा ? पाथर्डीत लॉगबुकवर सह्याच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 15:24 IST

तालुक्यातील दुष्काळी भागाला शासनाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली आहे.

हरिहर गर्जेपाथर्डी : तालुक्यातील दुष्काळी भागाला शासनाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली आहे.धामणगाव येथे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठा करणाºया एम. एच १२ ए. यू.४६९९ या टँकरची तपासणी केली असता चालक रमजान फकीर यांच्याकडे पाणी वाटपासंदर्भातील नोंदीचे लॉगबुक आढळून आले नाही. त्याचेकडे लॉगबुकची मागणी केली असता त्याने दुसरा टँकर क्रमांक एम.एच.१६ बी.३०७ याचे लॉगबुक दाखवले. त्यात ३० एप्रिलपर्यंत टँॅकर खाली होण्याची वेळ, खेपेचे अंतर, पाणीपुरवठा व स्वछता महिला समितीच्या सदस्य, ग्रामसेवक, मुख्याध्यापक यांच्या सह्यांचे रकाने कोरे असल्याचे दिसून आले. संबंधित गाडीच्या लॉगबुकबाबत विचारणा केली असता ते ग्रामसेवकांकडे सही करायला दिल्याचे चालकाने सांगितले.जी.पी.एस. यंत्रणा आढळून उघड्या वायरच्या जाळ्यात असून त्याची पिन काढून ठेवण्याची सुविधा करण्यात आल्याचे दिसून आले. धामणगाव येथील महिलांना विचारणा केली असता त्यांनी १५ दिवसांतून एकदा अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असून आजपर्यंत कोणीही त्यांची लॉगबुकवर सही घेतली नसल्याचे सांगितले.पाण्यासाठी कायपण!मोहटे गावात आठ दिवसांनी अपुºया प्रमाणात पाणी पुरवठा होत असून पाणी विहिरीत सोडण्यात आले. त्यामुळे पाणी भरण्यासाठी येथे एकच जीवघेणी गर्दी झालेली दिसली. महिला, पुरूष, लहान मुले, वृद्ध मिळेल ते भांडे घेऊन पाणी पदरात पाडून घेत होते. काही तरूण विहिरीच्या कठड्यावर उभे राहून पाणी शेंदत होते. गर्दीतील एखाद्याचा हलकासा धक्का बसला तर संबंधित तरूणाच्या जीविताला धोका निर्माण होणार होता.फुंदे टाकळी येथेही अशीच अनियमितता होती. आठ दिवसांपूर्वी येथे खासगी विहिरीत पाणी सोडताना टँकर चालक आढळल्याने याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.येथील टँकरच्या लॉगबुकवर प्रत्येक फेरीला गावातील वेगवेगळ्या व्यक्तीच्या सह्या घेतल्या जात असल्याने मागील खेपेला कधी पाणी वाटप झाले याबाबत माहिती नागरिकापासून दडवली जात असल्याचे ग्रामस्थ दादासाहेब फुंदे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी