शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

टँकर गेले कुण्या गावा ? नियमभंग करणा-या ठेकेदारांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 17:10 IST

टँकरच्या पाणी पुरवठ्यातील अनियमिततेबाबत ‘लोकमत’ने जिल्ह्यात केलेल्या स्टिंग आॅपरेशनची विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गंभीर दखल घेतली आहे.

अहमदनगर : टँकरच्या पाणी पुरवठ्यातील अनियमिततेबाबत ‘लोकमत’ने जिल्ह्यात केलेल्या स्टिंग आॅपरेशनची विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गंभीर दखल घेतली आहे. जे ठेकेदार पुरवठ्यात अनियमितता करताना आढळले त्यांच्यावर कारवाई करा, असा आदेश त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना दिला आहे.टँकरचे ठेकेदार वेळेवर जनतेपर्यंत टँकर पोहोचवत नाहीत. अनेक गावांमध्ये पाणी न पोहोचविताच नागरिकांच्या लॉगबुकवरस्वाक्ष-या घेण्यात आल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला आहे. टँकरचालक ‘लॉगबुक’ जवळ बाळगत नसल्याने बोगस बिले लावून टँकरची बिले काढली जातात, असाही संशय निर्माण झाला आहे.‘लोकमत’च्या २४ प्रतिनिधींनी एकाच वेळी केलेले हे स्टिंग समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. नाशिक महसूल विभागाचे आयुक्त राजाराम माने यांनी या वृत्तांकनाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांशीही संपर्क केला आहे. ज्या टँकरचालकांनी अनियमितता केल्याचे पुरावे सापडतील त्यांचेविरुद्ध कारावाई करा. विविध पथके पाठवून तपासणी करा, असा आदेश त्यांनी दिला आहे.ठेकेदारांमुळे अधिकारी पुन्हा अडचणीत४यापूर्वी नगर जिल्ह्यात २००२ मध्ये टँकर घोटाळा झाला होता. त्याप्रकरणात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची अद्यापही चौकशी सुरु आहे. याहीवर्षी जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. टँकर ठेकेदार प्रशासनावर दबाव आणून खोटी बिले मंजूर करण्याचा प्रयत्न करतात. त्याचे परिणाम मात्र अधिकारी, कर्मचा-यांना भोगावे लागतात. महसूल विभाग टँकरच्या निविदा मंजूर करतो. टँकरची अचानक तपासणी करण्याचे अधिकारही महसूलच्या अधिका-यांना आहे. मात्र, बिलांची जबाबदारी जिल्हा परिषदेवर येते.प्रशासन जनसुनवाई घेणार का?गत चार महिन्यात गावात खरोखर टँकर पोहोचले का? लॉगबुकवर ज्या स्वाक्ष-या दाखविण्यात आल्या आहेत त्या ख-या आहेत का? याची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने ग्रामसभा घेऊन जनसुनवाई घेण्याची आवश्यकता आहे. त्यातून टँकरचालकांची बनावटगिरी उघडकीस येऊ शकते. ही सुविधा जनतेपर्यंत नीट पोहोचत आहे का? हेही यातून समजू शकेल.लोकमत’कडे आहेत ‘स्टिंग’चे पुरावे‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी गावोगाव केलेल्या टँकरच्या ‘स्टिंग’चे छायाचित्रे व ‘व्हिडिओ’ उपलब्ध आहेत. ‘ लोकमत अहमदनगर’च्या फेसबुक पेजवर हे सर्व ‘व्हिडिओ’ प्रसारित करण्यात आले आहेत. अनियमतेविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रशासनाला हे पुरावे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर