शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

टँकर गेले कुण्या गावा ? पाण्याचा टँकर किती वजनाचा?

By सुधीर लंके | Updated: May 14, 2019 12:08 IST

पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे जे शासकीय टँकर आहेत त्या टाकीची वहन क्षमता म्हणजे वजन हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांचेकडून प्रमाणित करुन घ्यावे, असा शासनाचा आदेश आहे.

सुधीर लंकेअहमदनगर : पिण्याच्या पाणी पुरवठ्याचे जे शासकीय टँकर आहेत त्या टाकीची वहन क्षमता म्हणजे वजन हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांचेकडून प्रमाणित करुन घ्यावे, असा शासनाचा आदेश आहे. मात्र नगरच्या टँकर ठेकेदारांनी हे अधिकार पंचायत समितीच्या उपअभियंत्यांना देण्यात यावेत अशी अजब मागणी केली. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनीही त्याप्रमाणे शुद्धिपत्रक काढून टँकर लॉबीला सोयीचा होईल असा निर्णय घेतला. त्यामुळे टँकर आहे त्या वजनापेक्षा अधिक वजनाचे दाखवून बिले काढली जातात की काय? असा संशय निर्माण झाला आहे.सध्याचे जे पाणी पुरवठ्याचे टँकर आहेत हे मूळ पाण्याचे टँकर नाहीत. ट्रकच्या बॉडीवर पाण्याची टाकी ठेवली जाते. या टाकीत किती पाणी बसते हे आरटीओ ठरवितात. टाकीची वहन क्षमता ही आरटीओ यांनी ठरवावी असाच शासन आदेश आहे. कारण किती पाणी वाहिले जाते त्याच्या वजनानुसार ठेकेदारांना पैसे मिळतात.नगरचे ठेकेदार आरटीओकडून ही वहन क्षमता तपासून घेण्यास तयार नव्हते. पारनेर तालुक्यातील साई सहारा इन्फ्रा अ‍ॅण्ड फॅसिलिटी या ठेकेदार संस्थेने टाकीची वहन क्षमता पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंत्यांनी ठरवावी अशी मागणी निविदा समितीच्या बैठकीत केली. त्यानंतर इतरही ठेकेदारांनी ही मागणी नोंदवली.या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही वहन क्षमता आरटीओ किंवा पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी ठरवावी, असे शुद्धिपत्रक काढले. जिल्हाधिकाºयांनी ‘किंवा’ शब्द टाकल्याने टँकर ठेकेदारांनी सर्रासपणे ही वहन क्षमता पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांकडून तपासून घेतली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे चौकशी केली असता ‘आपणाकडे वहन क्षमता ठरविण्यासाठी कोणीही आलेले नाही’ असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जिल्हाधिका-यांनी ठेकेदारांच्या सोयीप्रमाणे हा बदल केला का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. शासनाने टँकरच्या नवीन दरांबाबत गत १९ डिसेंबरला आदेश काढला.या नवीन आदेशाचा आधार घेत जिल्हाधिका-यांनी जुनीच निविदा नव्या दराने मंजूर केली. मात्र याच आदेशात टँकरची वहनक्षमता ही आरटीओमार्फतच प्रमाणित करुन घ्या असे स्पष्टपणे नमूद असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.एक टन वजन वाढवून दाखविले तर....पाण्याच्या टँकरचे लबाडीने एक टन जरी वजन वाढवून दाखविले तरी ठेकेदाराला त्या टनामागे प्रतीदिन २३० रुपये व प्रती किलोमीटर २ रुपये ९० पैसे प्रमाणे बिल मिळते. पंचायत समितीच्या उपअभियंत्यांनी मंजूर केलेली वहन क्षमता व टँकरचे प्रत्यक्षातील वजन हे कोण पडताळून पाहणार? असा आता प्रश्न आहे. आरटीओ कार्यालयाची पथके पाठवून तातडीने टँकरच्या प्रत्येक टाकीचे वजन तपासणे आवश्यक आहे.गटविकास अधिका-यांनी घेतली धास्तीजिल्हाधिकारी कार्यालयाने टँकर पुरवठ्याचे काढलेले आदेश कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने गटविकास अधिकारी धास्तावले आहेत. भविष्यात याबाबत चौकशी झाल्यास बिलांची जबाबदारी गटविकास अधिका-यांवर निश्चित होणार आहे. जिल्हा प्रशासन आदेश काढते. मात्र, अंमलबजावणी गटविकास अधिका-यांकडे असल्याने ते धास्तावले आहेत. यापूर्वी टँकर घोटाळ्यात सात गटविकास अधिकारी एकाचवेळी निलंबित झालेले आहेत. अद्यापही ती चौकशी सुरु आहे.केवळ दुर्गम भागात जेथे ट्रॅक्टरवर पाण्याची टाकी नेण्याची वेळ येते तेथेच पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी टँकरचे वजन ठरविणे योग्य आहे. इतर ठिकाणी जेथे ट्रकवर टाकी ठेवली जाते तेथे ही वहन क्षमता व वजन आरटीओ यांनीच ठरवायला हवे. टँकर ठेकेदारांची जी निविदापूर्व बैठक झाली त्यात उपअभियंता हे वजन तपासतील व त्यानंतर ते वजन आरटीओ यांचेकडून प्रमाणित करुन आणायचे असेच ठरलेले आहे. तसे इतिवृत्तही आहे. याच पद्धतीने बिले काढली तर ती नियमानुसार होतील. - पोपट आघाव, संचालक, संत परमानंद बाबा टँकर ठेकेदार संस्था

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय