शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांची लाच घेताना पुरवठा निरीक्षक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 18:55 IST

स्वस्त धान्य दुकानावर कारवाई करू नये म्हणून दोन लाख रूपयांची लाच घेताना जिल्हा पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन गर्जे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

अहमदनगर : स्वस्त धान्य दुकानावर कारवाई करू नये म्हणून दोन लाख रूपयांची लाच घेताना जिल्हा पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन गर्जे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गुरूवारी दुपारी चारच्या दरम्यान जिल्हाधिकारी परिसरातील चांदणी चौकात ही कारवाई करण्यात आली.याबाबत भिंगार येथील स्वस्त धान्य दुकानदाराने तक्रार केली होती. भिंगार येथे असलेल्या स्वस्त धान्य दुकानात धान्य घेऊन जाणारा ट्रक काही दिवसांपूर्वी पुरवठा विभागाने पकडला. जिल्हा पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी तथा नायब तहसीलदार नितीन गर्जे यांनी ही कारवाई केली होती. हा ट्रक सोडावा व कारवाई करू नये म्हणून तक्रारदाराने गर्जे यांना पैसे देऊ केले. गर्जे यांनी ही कारवाई टाळण्यासाठी दोन लाख रूपयांची मागणी केली. तक्रारदाराने पैसे देण्याचे मान्य केले. त्याचवेळी तक्रारदाराने गुरूवारी (दि. १९) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.जिल्हाधिकारी कार्यालय ते चांदणी चौक या दरम्यान असलेल्या रस्त्यावर पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेथे सापळा लावला. गुरूवारी दुपारी चारच्या दरम्यान गर्जे आपल्या कारमध्ये तेथे आला. तक्रारदाराकडून दोन लाखांची रक्कम स्वीकारून तो घाईने कारमधून निघाला. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारचा पाठलाग करून चांदणी चौकात त्याला पकडले.गर्जे हा गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा पुरवठा विभागात कार्यरत आहे. शहरासह जिल्ह्यात असलेल्या स्वस्त धान्य दुकानांमधून सुरळीत धान्यपुरवठा होतो का? ग्राहकांपर्यंत शिधा पोहोचतो का? याची पाहणी करण्याचे काम पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचे असते. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय