शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोठे आहेत माजीमंत्री महादेव जानकर?..वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:31 IST

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर हे सध्या राहुरी तालुक्यातील मांजरी येथे ध्यानधारणा आणि शेतात रमले आहेत. सकाळी मुळा नदीकाठी योगासने, ध्यानधारणा व उर्वरित वेळेत बांधावरील शेतकºयांशी संवाद असा त्यांचा गेल्या महिनाभरापासून दिनक्रम सुरू आहे.

अहमदनगर : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर हे सध्या राहुरी तालुक्यातील मांजरी येथे ध्यानधारणा आणि शेतात रमले आहेत. सकाळी मुळा नदीकाठी योगासने, ध्यानधारणा व उर्वरित वेळेत बांधावरील शेतक-यांशी संवाद असा त्यांचा गेल्या महिनाभरापासून दिनक्रम सुरू आहे.जानकर हे लॉकडाऊनपूर्वी नगर जिल्ह्यात आले होते. महिनाभर संगमनेर येथील एका कार्यकर्त्याच्या घरी राहिले. त्यानंतर २ मे पासून ते राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांच्या मांजरी येथील निवासस्थानी वास्तव्यास आहेत. संचारबंदी व लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये, यासाठी जानकर यांनी जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. जुंधारे यांचे निवासस्थान मुळा नदीकाठापासून जवळच आहे. जानकर हे दररोज पहाटे पाच वाजता नदीकाठी योगासन व ध्यानधारणा करण्यासाठी जातात. त्यानंतर दिवसभरात पुस्तक वाचन, शेतात फिरून काम करणारे तरुण व शेतक-यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणे, असा त्यांचा दिनक्रम सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पळसवडे हे जानकर यांचे मुळगाव आहे. तेथे त्यांचे दोन भाऊ राहतात. जानकर हे मात्र गेली कित्येक वर्ष आपल्या घरी गेले नाहीत. 

एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री व सध्या आमदार असलेले सकाळी गुळाचा चहा, दोन वेळा साधा भाजी-भाकरीचा आहार घेतात. त्यांची ही साधी राहणी कार्यकर्त्यांना प्रेरणा देते, असे रासपचे युवक जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी सांगितले.

गेल्या दोन महिन्यांपासून नगर जिल्ह्यात वास्तव्यास आहे. या काळात ग्रामीण जीवनशैलीचा बारकाईने अभ्यास केला. राहुरी तालुका हा बागायती पट्टा आहे. या परिसरात बºयापैकी शेतकरी कुटुंब सधन असले तरी त्यांच्यात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. शेतक-यांनी मुलांना चांगले शिक्षण द्यावे़ जोडव्यवसाय करावे़ शासकीय योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहे, असे माजीमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.                     

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMahadev Jankarमहादेव जानकरRahuriराहुरी