शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी माती, वाळू आणली कोठून?; योजना संशयाच्या भोव-यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:50 IST

राज्य सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राज्यात राबवली. मात्र, या झाडांसाठी माती व वाळू आणली कोठून? असा कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. नगर जिल्ह्यात वृक्षलागवडीसाठी झालेल्या वाळू व मातीच्या  खर्चाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

सुधीर लंके । अहमदनगर : राज्य सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीची योजना राज्यात राबवली. मात्र, या झाडांसाठी माती व वाळू आणली कोठून? असा कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. नगर जिल्ह्यात वृक्षलागवडीसाठी झालेल्या वाळू व मातीच्या खर्चाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. झाडांची रोपे तयार करण्यासाठी माती लागते. दोन हजार रोपे तयार करण्यासाठी साधारणत: प्रत्येकी एक घनमीटर माती व बारीक वाळूचा वापर केला जातो. राज्य शासनाने सन २०१९ मध्ये राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. एवढी रोपे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर माती व वाळूचा वापर करावा लागेल. नगर जिल्ह्यात रोपे तयार करण्यासाठी किती वाळू व माती वापरण्यात आली? त्यापोटी महसूल विभागाकडे किती रॉयल्टी भरण्यात आली अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनी महसूल प्रशासनाकडे मागितली होती. मात्र, महसूल प्रशासनाने ही माहिती दिलेली नाही. सदरची माहिती वनविभागाकडे मिळेल, असे महसूलचे म्हणणे आहे. वनविभागानेही ही माहिती अद्याप दिलेली नाही. माती व वाळूच्या रॉयल्टीची माहिती महसूल विभागाकडे असायला हवी. मात्र, ही माहिती नाही याचा अर्थ रॉयल्टीच भरली गेलेली नाही. रोपांसाठी माती व वाळूवर बोगस पैसे दाखवून निव्वळ बिले काढली गेल्याची शक्यता चंगेडे यांनी व्यक्त केली आहे. रोपांसाठी अवैधपणे माती व वाळू वापरण्यात आली का याची चौकशी करावी, असा आदेश जिल्हा खनिकर्म विभागाने वनविभागाला दिला आहे. ..असा आहे रोपांचा हिशेबएक रोप तयार करण्यासाठी सुमारे साडेबारा रुपये खर्च येतो. नगर जिल्ह्यात २०१९ मध्ये १ कोटी १८ लाख रोपे लावण्यात आली. हा खर्च कोट्यवधीच्या घरात आहे. एवढ्या रोपांसाठी माती व वाळू कोठून आणली? त्याची रॉयल्टी भरली का? असा प्रश्न आहे. इतरही जिल्ह्यांत ही रॉयल्टी भरली गेली का? असा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. 

वनविभागाने केलेल्या वृक्ष लागवडीसाठी किती वाळू व माती वापरण्यात आली? त्यापोटी रॉयल्टी भरण्यात आली का? याबाबतची चौकशी प्रशासनाने सुरु केली आहे, असे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी सांगितले.     

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरenvironmentपर्यावरणforest departmentवनविभाग