शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये जाणाºया मजुरांना नगराध्यक्षच जेंव्हा पकडतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 11:23 IST

देवळाली प्रवरा प्रतिनिधी : इचलकरंजी येथील कापड मीलमध्ये काम करणारे कुटुंबिय आपल्या लेकरांसह माल वाहतूक गाडीतून  जात असताना देवळाली प्रवरा गुहा शिव परिसरात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कार्यकर्त्यांनी पकडले. कदम यांनी पोलिसांना  बोलावून घेत त्यांना प्रशासनाच्या हवाली केले. एवढेच नाही तर त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करून माणुसकीही दाखवली. 

देवळाली प्रवरा प्रतिनिधी : इचलकरंजी येथील कापड मीलमध्ये काम करणारे कुटुंबिय आपल्या लेकरांसह माल वाहतूक गाडीतून  जात असताना देवळाली प्रवरा गुहा शिव परिसरात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कार्यकर्त्यांनी पकडले. कदम यांनी पोलिसांना  बोलावून घेत त्यांना प्रशासनाच्या हवाली केले. एवढेच नाही तर त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करून माणुसकीही दाखवली. कोरोना पार्श्‍वभुमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात  आल्या. परंतु इचलकरंजी येथून सुमारे 70 जणांनी राजस्थान येथे जाणार्‍या मालवाहतूक वाहनांमध्ये बसून गावाकडे जाण्यास आगेकूच केली होती. दरम्यान, देवळाली प्रवरेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या मार्गदर्शनात अनेक स्वयंसेवक प्रशासनाच्या कामकाजात हातभार लावत आहेत. त्यांनी देवळाली प्रवरा शहरात विविध भागात चेक पोस्ट सुरू केली आहे. गणेगाव रोड चेक पोस्ट वर वाहनांची तपासणी सुरू असताना स्वयंसेवकांना खाद्य घेवून जात असलेल्या माल वाहतूक गाडीमध्ये काही लहान मुले दिसली. स्वयंसेवकांनी पाहणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये 60 ते 70 जण खाद्यामध्ये लपून बसलेले होते. त्यांच्यावर ताडपत्रीचे आवरण टाकलेले होते.स्वयंसेवकांनी तात्काळ नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याशी संपर्क साधला. नगराध्यक्ष कदम यांनी सर्वांना एका शाळेत नेत तहसीलदार व पोलिस प्रशासनाला घटनेची माहिती दिली. पकडलेल्या परप्रांतीय नागरीकांना जेवणाची व्यवस्था नगराध्यक्ष कदम यांनी केली. राहुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन बागूल, पोलिस हावलदार शिरसाठ, होमगार्ड प्रमुख अनिल कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहन चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर गाडीमध्ये सापडलेल्या सर्व परप्रांतीय नागरीकांना राहुरी फॅक्टरी येथील शासकीय शाळेमध्ये ठेवण्यात आले आहे.  इचलकरंजी येथील कापड मील कारखान्यातून संबंधित कामगारांनी राहुरी पर्यंत प्रवास केल्याचे पाहून प्रशासनही चक्रावले होते.------मजूर राहुरीतच राहणारराज्य व जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. माल वाहतूक करणार्‍यांनी परप्रांतीय नागरीकांना घेवून प्रवास करीत मोठी चूक केली. दरम्यान, संबंधित परप्रांतीय कामगारांना राहुरी फॅक्टरी येथील शाळेमध्ये ठेवावे लागणार आहे. लॉकडाऊन काळापर्यंत त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासन व स्वयंसेवी संस्थांकडून केली जाईल अशी माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली.