याबाबत त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिले असून, त्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याबाबत मागणी केली आहे. जिल्हा नियोजन समितीची मागील सभा ११ महिन्यांपूर्वी झाली. त्यानंतर सभा न झाल्याने जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मंजूर करता आलेला नाही. जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्याचे शासकीय इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत दुरुस्ती, तसेच नवीन इमारतीसाठी जिल्हा नियोजन समितीची सभा न झाल्याने निधी उपलब्ध झालेला नाही. रस्त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली असल्याने जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक लोकांचे बळी गेले. वास्तविक पाहता जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्याच्या विकास आराखड्यावर चर्चा होऊन अनेक शासकीय विभागांना निधीचे वितरण केले जाते; परंतु सभा न झाल्याने आरोग्य, शिक्षण, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, नरेगा, तसेच इतर विभागांच्या योजना प्रशासनाला राबविता आल्या नाहीत. त्यामुळे आपण त्वरित सभा घ्यावी, अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे.
जिल्हा नियोजन समितीची सभा कधी घेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST