शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

...जेव्हा अचानक राहुल गांधी संगमनेरला मुक्काम करतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 04:58 IST

साधेपणाचा अनुभव, तोच कुर्ता धुऊन प्रचारासाठी रवाना

सुधीर लंके अहमदनगर : ऐनवेळी मुक्काम करण्याची वेळ आल्यावर अंगावरील आहे तेच कपडे रात्रीतून धुऊन पुढील प्रवास करण्याची वेळ सामान्य माणसावर येते. तोच साधेपणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडूनही संगमनेरकरांना अनुभवायला मिळाला. मुक्कामात सोबत काहीच नसल्याने रात्रीचे वापरण्याचे कपडे देखील त्यांनी संगमनेरमधील एका दुकानातून घेतले.

संगमनेर येथे सायंकाळी सात वाजता त्यांची सभा होणार होती. मात्र, ते रात्री आठ वाजता विमानाने नाशिक येथे पोहोचले. तेथून पुढे दीड तासांचा प्रवास करुन कारने ते संगमनेरला आले. उशीर झाल्यामुळे भाषण त्यांना अर्ध्या तासातच संपवावे लागले. सभा संपल्यावर रात्री त्यांनी ‘मै आज यही व्हॉल्ट करुंगा’ अशी इच्छा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडे प्रदर्शित केली. संगमनेर अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील ‘पर्णकुटी’ विश्रामगृहावर व्यवस्था करण्यात आली.

मुक्कामाच्या तयारीने न आल्यामुळे राहुल यांचेसोबत दैनंदिन वापरण्याच्या कपड्याची बॅग देखील नव्हती. अंगावरील कुर्ता त्यांनी रात्री धुण्यासाठी दिला व सकाळी इस्त्री करुन तो पुन्हा वापरला. रात्रीच्या जेवणात त्यांनी मराठमोळी झुणका भाकरी तर सकाळचा नाश्ता म्हणून थालीपीठ खाल्ले. या मुक्कामात त्यांनी बाळासाहेब व सत्यजित तांबे यांच्या परिवाराशी संवाद साधला.

इन्स्टाग्रामवर फोटो शेअरसंगमनेर येथून साडेदहाच्या सुमारास हेलिकॉप्टरने ते नाशिकला रवाना झाले. या वेळी थोरात हे त्यांच्या समवेत होते. या प्रवासात राहुल गांधी यांनी थोरात यांच्या गळ्यात हात घालून छायाचित्र काढले. त्यांनी स्वत:च ते इन्स्टाग्रामवर शेअर केले.

गतवेळच्या मुक्कामानंतर नगरला मिळाला विरोधी पक्षनेता२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचाराला आले होते. त्यावेळी त्यांची लोणी येथे सभा झाली होती. या सभेनंतर ते कारने शिर्डी येथे हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेले. या प्रवासात राधाकृष्ण विखे यांनी कारचे सारथ्य केले होते. या वेळी त्यांनी संगमनेर येथे मुक्काम केला. गतवेळच्या मुक्कामात राधाकृष्ण विखे व बाळासाहेब विखे हे त्यांच्या सानिध्यात होते. तेथून विखे व त्यांची जवळीक अधिक वाढली. पुढे विखे विरोधी पक्षनेते झाले. या वेळी विखे यांनी कॉंग्रेसची साथ सोडली आहे. थोरात हे आता गांधी परिवाराच्या सानिध्यात आहेत.

‘लोकमत’च्या मुलाखतीचे केले अवलोकनराहुल गांधी यांची दीर्घ मुलाखत शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाली. या मुलाखतीचेही सकाळी गांधी यांनी अवलोकन केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात