शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशन ब्लॅक टोर्नाडो सक्सेस होते तेव्हा... - नगरचे भूमिपूत्र राष्ट्रपती पदकाचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:04 IST

मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना २६/११ च्या हल्यातील अतिरेक्यांशी संघर्ष करण्याची संधी मिळाली ही आजपर्यंतच्या करिअरमधील अभिमानाची बाब असल्याचे मत या आॅपरेशनमध्ये सहभागी झालेले पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर रायभान वाघ यांनी ‘लोकमत’ची बोलताना व्यक्त केले.

अरूण वाघमोडेअहमदनगर : हॉटेल ताजवर अतिरेक्यांनी हल्ला केल्याची खबर मिळातच मुंबई क्राईम ब्रॅन्चची ५० जणांची टीम तत्काळ दाखल झाली.. काही वेळातच एनएसजी कमांडोंनी हॉटेलचा ताबा घेतला. कमांडो ग्राऊंड बॅकअप देण्याची जबाबदारी आमच्यावर होती. अतिरेक्यांच्या टार्गेटवर असलेल्यांना सुरक्षित बाहेर काढने हेच लक्ष्य होते. हॉटेलमधून फक्त फायरिंग अन् किंचाळ्यांचा आवाज घुमत होता. अखेर ५९ तासानंतर शेवटचा अतिरेकी मारला गेला अन् ‘आॅपरेशन ब्लॅक टोर्नाडो’ सक्सेस झाले. मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना २६/११ च्या हल्यातील अतिरेक्यांशी संघर्ष करण्याची संधी मिळाली ही आजपर्यंतच्या करिअरमधील अभिमानाची बाब असल्याचे मत या आॅपरेशनमध्ये सहभागी झालेले पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर रायभान वाघ यांनी ‘लोकमत’ची बोलताना व्यक्त केले.नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील ज्ञानेश्वर वाघ हे सध्या मुंबईत कायदा व सुव्यवस्था शाखेत कार्यरत आहेत. उत्कृष्ठ कामगिरीसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना राष्ट्रपदी पदक जाहीर झाले आहे. शेतकरी कुटुंबात जन्म आणि घरात कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना ज्ञानेश्वर यांनी जिद्ध आणि चिकाटीने विशेष प्राविण्यासह बीटेक आणि एमटेक पदवी प्राप्त केली. पुढे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी पदावर रूजू झाले. मुंबईत पोलीस दलात विविध शाखांमध्ये मध्ये काम करताना ज्ञानेश्वर यांनी कामातील तत्परता अधोरेखित करत अनेक गुन्ह्यांची उकल केली.

गौरवास्पद कामगिरी

मुंबई परिसरात धुमाकूळ घालणारी कट्टाशेखर गँगने १९९७ साली मुंबई-अहमदाबात महामार्गावर महानंदा दूध डेअरीची ५७ लाखांची कॅश लुटली. ज्ञानेश्वर तेंव्हा मुंबईत वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ज्ञानेश्वर यांच्यासह त्यांच्या टीमने कट्टाशेखरसह त्याच्या टोळीतील आठ जणांना तामीळनाडूतून अटक केली. मुंबईत एका प्रदर्शनातून दुबईच्या लुटणारूंनी सव्वा कोटींचे हिरे चोरले होते. या गुन्ह्यातील आरोपींना वाघ यांच्या नेतृत्वाखालील टीमने २४ तासांच्या आत दुबई येथून अटक केली. ज्ञानेश्वर यांच्या पोलीस दलातील २३ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना २९ बक्षिसे मिळाली आहेत. यामध्ये उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी, क्राईम बॅ्रन्चचे तत्कालीन अधिकारी देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली टीममध्ये २६/११ च्या हल्यात विशेष कामगिरी, हि-यांचा २४ तासांत शोध, उत्तर कोरिया खंडात शांतीदूत, न्यायमूर्ती कापडिया यांच्याहस्ते बक्षिस, विधी, एमबीए पदवीत विशेष प्राविण्य, मानवी हक्क विभागात प्रथम ते आता राष्ट्रपती पदकाचे मानकरीफोटो २५ पीएसआय वाघ

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस