अहमदनगर : केंद्राचे पथक पाहणीसाठी येणार असल्याने स्वच्छतेची पूर्वतयारी सुरू आहे. दुसरीकडे मात्र महापालिका कार्यालयांतच कमालीची दुर्गंधी पसरली जुन्या महापालिकेतील कोपरे पिचकाऱ्यांनी रंगले आहेत.
महापालिकेने फाईव्हस्टार मानांकनासाठी नोंदणी केली आहे. स्वच्छता विभागाने केलेल्या स्वच्छतेबाबतच्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक नगर शहरात दाखल होणार आहे. या पथकाकडून पाहणी होणार असल्याने स्वच्छतेत कुठलीही कमी राहू नये, यासाठी राज्य प्रकल्प अधिकाऱ्यांकडून स्वच्छतेसह विविध प्रकल्पांना भेटी दिल्या जात आहेत. पथकाने केलेल्या सूचनांची अंमलबजावणीही मनपाकडून करण्यात येत आहे. असे असले तरी माळीवाड्यातील जुन्या महापालिका कार्यालयात कमालीची अस्वच्छता आहे. जुन्या महापालिकेच्या रेकॉर्ड विभागाच्या प्रवेशव्दारात कुलर ठेवण्यात आला आहे. रेकॉर्ड विभागात दररोज नागरिक येतात. माहिती घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागतात. मात्र हे कुलरच बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, या कुलरभोवतीचा कोपरा पिचकाऱ्यांनी लाल झाला आहे.
..
सूचना फोटो: ०५ कुलर नावाने आहे